आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: ही आहे राजीव खंडेलवालची Glamorous पत्नी, पाहा छायाचित्रे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- पत्नी मंजरीसोबत राजीव खंडेलवाल) - Divya Marathi
(फाइल फोटो- पत्नी मंजरीसोबत राजीव खंडेलवाल)
छोट्या पडद्यावरील 'कहीं तो होगा', 'सच का सामना', 'रिपोटर्स' या गाजलेल्या कार्यक्रमांमधून लोकप्रियता प्राप्त करणारा अभिनेता राजीव खंडेलवाल आज आपला 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. राजीवने प्रॉडक्शन हाऊसपासून ते मॉडेलिंग, अभिनय आणि सूत्रसंचालनात आपला हात आजमावला आहे.

राजस्थानमधील जयपूर येथे जन्मलेल्या राजीवने दिल्लीतील एका प्रॉडक्शन हाऊसमधून आपल्या करिअरला सुरुवात केली. मॉडेलिंग क्षेत्राकडे वळल्यानंतर त्याने LML, ग्रीन लेव्हल विस्की, कोडक आणि व्हिडिओकॉन यांसारख्या ब्रॅण्ड्ससाठी मॉडेलिंग केले. 'सच का सामना' या टीव्ही शोमध्ये राजीव घराघरांत पोहोचला. मात्र शोच्या फॉर्मेटमुळे अनेकदा हा शो वादात अडकला होता.

मनोरंजन जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर राजीवने 7 फेब्रुवारी 2011 रोजी गर्लफ्रेंड मंजरी कमटीकरसोबत लग्न केले. जयपूरमध्ये एका खासगी सोहळ्यात हे दोघे लग्नगाठीत अडकले. लग्नापूर्वी राजीव टीव्ही अभिनेत्री आमना शरीफला डेट करत असल्याच्या बातम्या चर्चेत होत्या. मात्र मंजरीसोबत लग्न करुन राजीवने सर्व अफवांना पूर्णविराम लावला.
टीव्ही करिअरः क्या हादसा क्या हकीकत (2002), कहीं तो होगा (2003-2005), लेफ्ट राइट लेफ्ट (2006-2007), सच का सामना सीजन 1 आणि 2 (2009,2011), हम ने ली...शपथ (2014)
फिल्मी करिअरः आमिर (2008), शैतान (2011), विल यू मॅरी मी (2012), टेबल नं. 21 (2013), सम्राट अँड कंपनी (2014)

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा पत्नीसोबतची राजीवची निवडक छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...