सुपरस्टार राजेश खन्ना यांची आज (18 जुलाई, 2012) 5वी पुण्यतिथी आहे. डिंपल कपाडियाबरोबर लग्न केल्यानंतरही राजेश खन्ना टीना मुनीम यांच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. राजेश खन्ना यांनी डिंपला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न करावे अशी टीना मुनीमची इच्छा होती. राजेश खन्नांनी तिला लवकरच डिंपलला घटस्फोट देणार असल्याचे आश्वासनही दिले होते. पण अनेक दिवस लोटल्यानंतरही तसे झाले नाही, त्यामुळे टीनाने राजेश खन्नांपासून लांब राहणे सुरू केले. असे सांगितले जाते की, टीना जेव्हा राजेश खन्ना यांना सोडून जाणार होती, तेव्हा राजेश यांनी ती जाऊ नये म्हणून तिच्या विनवण्या केल्या होत्या. पण टीनाने त्याचे ऐकले नाही.
हिंदी सिनेमाचे पहिले सुपरस्टार..
राजेश खन्ना हे हिंदी सिनेमाचे पहिले सुपरस्टार होते, आणि मुली त्यांच्यासाठी वेड्या झाल्या होत्या असे म्हटले जाते. त्याच दरम्यान 70 च्या दशकात एका अॅक्ट्रेसने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. तिचे नाव होते, टीना मुनीम. 1976 मध्ये देश परदेशमधून पदार्पण करणारी टीनाही राजेश खन्नांचत्या प्रेमात पडली. राजेश खन्ना आणि डिंपल यांचे लग्न झालेले होते तरी टीना मुनीमने राजेश खन्ना यांना स्वतःच्या जवळ येऊ दिले. टीनाला राजेश खन्नांचे स्टारडम आवडत होते आणि राजेश खन्नांना तिचे सौंदर्य. असे म्हटले जाते की, 80 च्या दशकात त्यांचे अफेयर सुरू असताना टीनाने राजेश खन्ना यांच्यावर लग्नासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. राजेश खन्ना यांनीही डिंपलला घटस्फोट देऊल लग्न करण्याचे आश्वासन टीनाला दिले. पण राजेश खन्ना डिंपलबरोबर कधीही घटस्फोटाबाबत बोलले नाही. अनेक वर्षे वेगळे राहूनही अखेरपर्यंत त्यांचा घटस्फोट झाला नाही. राजेश खन्ना आणि टीना मुनीम यांनी \'फिफ्टी-फिफ्टी\' (1981), \'सुराग\' (1982), \'सौतन\' (1983), \'अलग-अलग\' (1985), \'आखिर क्यो\' (1985), \'अधिकार\' (1986) सह अनेक चित्रपट केले. दोघांचे नाते 1987 मध्ये संपुष्टात आले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, राजेश खन्नांशी संबंधित आणखी काही किस्से..