आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनीकांत यांच्याकडे आजही आहे Fiat कार, परत केली होती शाहरुखची BMW

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिजेंडरी अभिनेते रजनीकांत यांचा आज 65वा वाढदिवस आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी हा दिवस एखाद्या फेस्टिव्हलपेक्षा कमी नाहीये. परंतु स्वत: रजनीकांत यांनी चेन्नईमध्ये आलेल्या पूरामुळे लोकांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगून कोणतेही सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय घेतला आहे. आजही संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या नावाची चर्चा असते. परंतु तुम्हाला ठाऊक आहे का या सुपरस्टारला कोणती कार चालवायला आवडते. रजनी यांची पसंत ऐकून तुम्ही हैराण व्हाल.
हो खरंच, रजनीकांत यांना ब्लॅक कलरची 'प्रीमिअर पद्ममिनी फिएट' कार आजसुध्दा आवडते. मात्र त्यांच्याकडे अनेक कार असूनदेखील त्यांना या कारमध्ये विशेष रुची आहे. इतके नव्हे, प्रवासासाठी रजनी इनोव्हा कारवर विश्वास ठेवतात. रजनीकांत यांना रा-वन सिनेमातील कॅमियो भूमिकेसाठी अभिनेता शाहरुख खानने एक 'बीएमडब्ल्यू 7' सीरिजची शानदार कारसुध्दा गिफ्ट केली होती, परंतु रजनीकांत यांनी ती घेण्यास नकार दिला. कारण त्यांना लक्झरी कारमध्ये प्रवास करायला आवडत नाही.
या सुपरस्टारला आवडत नाहीत लक्झरी कार-
सिंपल लाइफस्टाइलसाठी ओळखले जाणारे रजनीकांत एकापेक्षा एक सुपरकार खरेदी करू शकतात. मात्र त्यांना लक्झरी कारची क्रेझ नाहीये. त्यांच्याकडे, फिएट, एम्बेसडर, इनोव्हा, टवेरा आणि होंडा सिविकसारख्या कार आहेत.
1980च्या पद्ममिनी
रजनीकांत यांनी 1980च्या सुरुवातीला पहिली सेडान प्रीमिअर पद्ममिनी खरेदी केली होती. त्यामध्ये विशेषत: रजनी यांच्यासाठी कंपनीने स्वत: एक्स्ट्रा फिचरसुध्दा दिले होते. एकेकाळी प्रीमिअर पद्मीमिनी खूप चर्चेत होती, तेव्हा रजनी यांनी ही कार खरेदी केली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या रजनीकांत यांच्याकडे कोण-कोणत्या कार आहेत...
बातम्या आणखी आहेत...