आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनीकांतचे हे जावई आहेत बिझनेसमन, जाणून घ्या लग्नापासून घटस्फोटापर्यंत कसे पोहोचले नाते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्लीः साऊथ इंडस्ट्रीचे सुपरस्टार रजनीकांत यांची धाकटी कन्या सौंदर्याचे वैवाहिक आयुष्य संकटात सापडले आहे. डेक्कन क्रॉनिकलमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, सौंदर्याने तिचा नवरा अश्विन राजकुमारपासून घटस्फोट घेण्यासाठी फॅमिली कोर्टात अर्ज दाखल केला आहे. २०१० मध्ये दोघांचे लग्न झाले होते.

कोण आहे रजनीकांतचे जावई...
- अश्विन चेन्नईतील प्रसिद्ध इंडस्ट्रियलिस्ट आहेत. चेन्नईतील रिअल स्टेट टायकून राजकुमार अश्विनचे वडील आहेत. सध्या अश्विन केवीएस कन्स्ट्रक्शनचे डायरेक्टर असून स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटीतून एमएसचे शिक्षण घेतले आहे.
- सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण अश्विन यांनी चेन्नईतील एसआरएम कॉलेजमधून केले. शिक्षणानंतर फॅमिली बिझनेस सांभाळत आहेत.

कशी सुरु झाली सौंदर्या-अश्विनची लव्ह स्टोरी...
- सौंदर्या आणि अश्विनची लव्ह स्टोरी चेन्नईतील एका जिममधून सुरु झाली होती. दोघांचे टायमिंग वेगळे होते, मात्र येता-जाता दोघांची भेट व्हायची.
- एकेदिवशी अश्विनने सौंदर्याशी बोलताना म्हटले, की तू रजनीकांतची मुलगी आहेस.. मी त्यांचा मोठा चाहता आहे.
- पुढे एका कॉमन फ्रेंडच्या घरी अश्विन-सौंदर्याची पुन्हा एकदा भेट झाली. दोघांमध्ये हळूहळू मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
- नंतर अश्विनने सौंदर्याला लग्नाची मागणी घातली आणि २०१०मध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.
- अश्विन-सौंदर्याला एक वर्षांचा मुलगा आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, अश्विन-सौंदर्याचे खास PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...