आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day Spcl: रजनीकांत यांचा जावई आहे धनुष, पत्नी ऐश्वर्या आहे वयाने दोन वर्षे मोठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'कोलावरी डी' या गाण्याने प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता धनुष आज आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. 28 जुलै 1983 रोजी चेन्नईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला. धनुषचे खरे नाव वेंकटेश प्रभू कस्तुरी राजा आहे. साऊथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक कस्तुरी राजा यांचा तो मुलगा आहे. वयाच्या 16 व्या वर्षी धनुषने त्याच्या वडिलांच्या दिग्दर्शनात बनलेल्या 'थुल्लुवाधो इलामाई' या सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. साऊथसोबतच तो 'रांझणा' आणि 'षमिताभ' या बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकला आहे.
ऐश्वर्यासोबतची पहिली भेट...
साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिच्यासोबत धनुष नोव्हेंबर 2004 मध्ये लग्नगाठीत अडकला. दोघांची पहिली भेट धनुष स्टारर 'काधाल कोन्दें' या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगवेळी झाली होती. या सिनेमातील धनुषचा अभिनय पाहून ऐश्वर्या खूप इम्प्रेस झाली होती. त्यानंतर तिने त्याला बुके पाठवला आणि हळूहळू दोघांमध्ये मैत्री वाढली. वर्षभरानंतर दोघे लग्नगाठीत अडकली. विशेष म्हणजे ऐश्वर्या धनुषपेक्षा वयाने दोन वर्षे मोठी आहे. वयाच्या 21 व्या वर्षी म्हणजे 18 नोव्हेंबर 2004 रोजी धनुष ऐश्वर्यासह लग्नगाठीत अडकला. तर वयाच्या 23 व्या वर्षी तो वडील झाला. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. त्यांच्या पहिल्या मुलाचा जन्म 2006 मध्ये तर दुस-या मुलाचा जन्म 2010मध्ये झाला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा त्याची खास छायाचित्रे आणि सोबत जाणून घ्या त्या आयुष्यातील रंजक गोष्टी...