Home »Gossip» Rakesh Om Prakash Mehra Revealed 5 Untold Story Of Amitabh Bachchan

या डायरेक्टरने सांगितल्यामुळे अमिताभ यांनी ठेवली होती फ्रेंच दाढी, वाचा असेच 5 किस्से

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 13:14 PM IST

मुंबई - 'रंग दे बसंती', 'भाग मिल्खा भाग', 'अक्स' असे चित्रपट तयार केलेले राकेश ओमप्रकाश मेहरा हे दिग्दर्शक असण्याबरोबरच प्रसिद्ध अॅडमेकरही आहेत. अमिताभ बच्चन यांना अॅड वर्ल्डमध्ये आणण्याचे श्रेयही त्यांनाच जाते. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्याशी बोलून आम्ही बिग बींबाबत काही खास किस्से जाणून घेतले. तेच किस्से आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

त्यादिवसापासून बिग बींनी ठेवली फ्रेंचकट दाढी
राकेश ओमप्रकाश मेहरा म्हणतात, 'अक्स' दरम्यान मला सल्ला देण्यात आला होता की, आपण फ्रेंचकट दाढी ठेवुयात. त्यावर बिग बी म्हणाले होते, आजवर कोणत्याही हिरोने अशी दाढी ठेवलेली नाही. कदाचित प्रेक्षकांना चे आवडणार नाही. सुमारे सहा महिने यावर चर्चा सुरू होती. राकेश ओमप्रकाश मेहराही अडून बसले होते. अखेरच आता तिच फ्रेंचकट त्यांची कायमची ओळख बनली आहे.

प्रत्येक चित्रपटाचा पहिला शो त्यांच्यासाठी...
अमिताभ बच्चन माझे मेंटॉर आहेत, त्यांनी मला सिनेमाच्या जगात नवा जन्म दिला आहे. मी कोणताही चित्रपट तयार करतो तेव्हा, पहिला शो अमिताभ यांच्यासाठी ठेवत असतो. हा माझ्याकडून त्यांचा ट्रिब्युट असतो. सध्या मी त्यांना कोणतीही नवी कथा ऐकवलेली नाही. पण मी नव्या स्टोरीलाइनवर काम करतो, तेव्हा त्यांच्याबाबत एकदा विचार नक्की करतो.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर काही किस्से..

Next Article

Recommended