आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: भेटा रोशन फॅमिलीला, जाणून घ्या राकेश रोशन यांच्या कुटुंबात कोण-कोण आहेत?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये रोशन कुटुंबाचा उल्लेख होताच हृतिक रोशनचे नाव सर्वांच्या ओठांवर येतं. हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी फिल्म इंडस्ट्रीतील जेवढी लोकप्रियता प्राप्त केली, त्याहीपेक्षा लोकप्रिय हृतिक ठरला. आज हृतिकचे वडील आणि बॉलिवूडचे यशस्वी अभिनेते-दिग्दर्शक-निर्माते राकेश रोशन यांचा वाढदिवस असून त्यांनी आपल्या वयाची 67 वर्षे पूर्ण केली आहेत.
राकेश रोशन यांनी अभिनेता म्हणून 1970 मध्ये 'घर घर की कहानी' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला. खून भरी मांग, खेल खेल में, खट्टा मीठा, खुबसूरत यांसह जवळपास 40 सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला. त्यानंतर दिग्दर्शक म्हणून त्यांनी 'खुदगर्ज' (1987) या सिनेमाद्वारे आपली सेकंड इनिंग सुरु केली. 'काला बाजार', 'किशन कन्हैया', 'करण अर्जुन', 'कहो ना प्यार है', 'कोई मिल गया', 'क्रिश' या सिनेमांचे यशस्वी दिग्दर्शन केले.
मुलगा हृतिकला त्यांनी 'कहो ना प्यार है' या सिनेमाद्वारे फिल्म इंडस्ट्रीत लाँच केले. या सिनेमाने हृतिकला एका रात्रीत सुपरस्टार बनवले. तसे पाहता, हृतिकने आपल्या वडिलांपेक्षा जास्त लोकप्रियता प्राप्त केली आहे. बॉलिवूडच्या सुपरस्टार्सच्या यादीत हृतिकची गणती होते. हृतिक त्याची पत्नी सुझान खानपासून कायदेशीररित्या कायमचा विभक्त झाला आहे.
रोशन कुटुंबातील राकेश आणि हृतिक यांनाच लोक जास्त ओळखतात. रोशन कुटुंबाविषयी लोकांना फारसे ठाऊक नाहीये. रोशन यांच्या तीन पिढ्या फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत.
आज राकेश रोशन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला रोशन कुटुंबातील सदस्यांची ओळख करुन देत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या रोशन कुटुंबातील सदस्यांविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...