आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now And Then: Rakhi Sawant Before And After Plastic Surgery

PICS: सर्जरी करण्यापूर्वी अशी दिसत होती राखी सावंत, नाव होते नीरू भेडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: राखी सावंत
मुंबई- बॉलिवूडची आयटम गर्ल आणि कॉन्ट्राव्हर्शिअल क्वीन म्हणून ओळखली जाणारी प्रसिध्द अभिनेत्री राखी सावंत 37 वर्षांची झाली आहे. 25 नोव्हेंबर 1978ला मुंबईमध्ये जन्मलेल्या राखीचे खरे नाव नीरू भेडा आहे. तिचे वडील आनंदी सावंत वरळी पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल होते.
सिनेमा आणि टीव्ही इंडस्ट्रीत करिअर
राखीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 'Agnichakr'मधून केली होती. 2003मध्ये तिने 'चुरा लिया है तुमने' या आयटम नंबरसाठी चारवेळा ऑडिशन दिले होते. अखेर 'मोहब्बत है मिर्ची...' गाण्यातून तिला ब्रेक मिळाला. तिने 'मस्ती', 'मैं हू न' आणि 'दिल बोले हडप्पा'सारख्या सिनेमांत काम केले आहे. 'राखी का स्वयंवर', 'बिग बॉस सीझन 1', 'नच बलिए 3'सारखे टीव्ही शोसुध्दा केले आहेत.
मीका आणि राखी सावंतची कॉन्ट्राव्हर्सी-
बॉलिवूडमध्ये स्पष्टवक्ता स्वभावासाठी ओळखली जाणारी राखी सावंत 2006मध्ये मीकाच्या बर्थडे पार्टीत गेली होती. तिथे मीकाने तिला खुलेआम किस केले होते. या प्रकराने लालबुंद झालेल्या राखीला चर्चेत राहण्याची एक संधीच मिळाली आणि मीरा वादाच्या भोव-यात अडकला. इतकेच नव्हे या वादानंतर मीकाने राखीची खिल्ली उडवण्यासाठी एक गाणेसुध्दा बनवले होते, 'ए भाई तूने पप्पी क्यो ली'
प्लास्टिक सर्जरीने एकवटली चर्चा-
नेहमीच वादात अडकणारी राखी सावंतने प्लास्टिक सर्जरीसुध्दा केली आहे. मात्र या सर्जरीने तिच्या सौंदर्यावर चार चाँद लावण्याऐवजी तिच्या सौंदर्याची वाट लावली. राखीचे जूने आणि आताचे फोटो पाहून अंदाजा लावला जाऊ शकतो, की तिच्या लूकमध्ये बराच बदल झाला आहे. बातम्यांनुसार, तिने Nose Job आणि Lip Enhancement केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा राखी सावंतचे खास PHOTOS... आणि तिच्यात झालेला बदल...