आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामूची 'श्रीदेवी' म्हणाली, 'स्क्रिप्टच्या डिमांडवर करू शकते अंगप्रदर्शन'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- दिग्दर्शक रामगोपाल वर्मा (रामू) लवकरच तामिळ आणि तेलगुमध्ये 'श्रीदेवी' सिनेमा रिलीज करणार आहे. हा सिनेमा 15 वर्षांच्या एका किशोरवयीनची 25 वर्षीय तरुणीकडे आकर्षित होण्याची कहानी आहे. यामध्ये राजधानीची मॉडर्न टर्न अभिनेत्री अनुकृती गोविंद शर्मा श्रीदेवी नावाच्या मुख्य भूमिकेत आहे. यामध्ये एक अल्पवयीन मुलामध्ये सेक्स संवेदना उत्तेजित झाल्याचे दाखवण्यात आले आहे. तो कसे पोर्न, ग्लॅमर आणि सेक्सच्या जाहिरातींकडे प्रभावित जातो. राजधानीमध्ये पोहोचलेल्या अनुकृतीने सांगितले, 'पटकथेची मागणी असल्यास तिला अंगप्रदर्शन करण्यास काहीच अडचण नाहीये.'
रामगोपाल वर्माने सुरुवातीला या सिनेमाचे नाव 'सावित्री' ठेवले होते. याच्या बोल्ड पोस्टरमुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर सिनेमाचे शिर्षक बदलून 'श्रीदेवी' ठेवण्यात आले. परंतु अभिनेत्री श्रीदेवीने कायदेशीर नोटीस पाठवून सिनेमाचे नाव बदलण्यास सांगितले आहे. याविषयी अनुकृती सांगते, की सिनेमा कुणाच्या जीवनपटावर आधारित नाहीये. यावर आक्षेप घेण्यासारखे काहीच नाहीये. यामध्ये तिच्यासोबत 'सत्या' फेम जेडी चक्रवर्ती आणि बालकलाकार तेजासुध्दा मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाची 75 टक्के शूटिंग पूर्ण झाले आहे आणि मेच्या पहिल्या आठवड्यात सिनेमा रिलीज होऊ शकतो.
एकुलती एक मुलगी-
अनकृतीने सांगितले, की ती आपल्या पालकांची एकुलती एक मुलगी आहे. तिचे वडील निवृत्त सिव्हिल सर्वेंट असून आई आशा शर्मा सिव्हिल सर्विसमध्ये आहे. तिच्या आईचा तिला नेहमी पाठिंबा राहिलेला आहे. तिला आयुष्यात जे हवे होत तिला मिळत गेले याचा अनुकृतीला आनंद आहे.
कहाणीच्या मागणीवर अंगप्रदर्शन
अनुकृती सांगते, 'मी एक आर्टिस्ट आहे. जर कहाणीत दमदार असेल आणि सिनेमात त्याची गरज असेल तर अंगप्रदर्शन करण्यास मला काही अडचण नाहीये. मला वाटले, की ते मर्यादेपेक्षा जास्त होतय तर मला माझी मर्यादा माहित आहे. हे पटकथाच्या मागणीवर करू शकते. तुमचा परफॉर्मन्ससुध्दा तितकाच दमदार असायला हवा.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अनुकृतीने आणखी काय-काय सांगितले...