आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'राम तेरी गंगा मैली\'ची मंदाकिनी आजही दिसते ग्लॅमरस, लवकरच म्हटले होते बॉलिवूडला अलविदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः ऐंशी आणि नव्वदच्या दशकातील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी मंदाकिनी आता 48 वर्षांची आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात 1985 मध्ये 'अंतारेर भालोबाशा' या बंगाली सिनेमाद्वारे केली होती. याचवर्षी 'मेरा साथी' या सिनेमाद्वारे मंदाकिनीने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. 1985 सालीच तिला आणखी दोन हिंदी सिनेमे मिळाले. ते म्हणजे 'आर पार' आणि 'राम तेरी गंगा मैली' हे सिनेमे होते. राज कपूर यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला 'राम तेरी गंगा मैली' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या सिनेमाने मंदाकिनीचे करिअर यशोशिखरावर नेले. या सिनेमात मंदाकिनीने दिलेल्या बोल्ड सीन्सची चर्चा आजही होते. बोल्ड सीन्स देण्यास मंदाकिनीने कधीही नकार दिला नाही, कदाचित त्यामुळेच तिचे करिअर वेगाने पुढे गेले. मात्र अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत नाव जुळल्याने तिच्यावर बरीच टीका झाली होती.
 
1985 पासून सुरु झालेले मंदाकिनीचे करिअर 1996मध्ये 'जोरदार' या सिनेमाद्वारे संपुष्टात आले. सिनेमांपासून संन्यास घेण्याच्या दोन वर्षांपूर्वी तिचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत जुळले होते. क्रिकेटच्या मैदानात तिला अनेकदा दाऊदसोबत बघितले गेले. ऐंशीच्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मंदाकिनी आता तिब्बतन योगा क्लासेस चालवते. शिवाय ती दलाई लामा यांची फॉलोअरसुद्धा आहे. तिच्या लूकमध्येही बराच बदल झाला आहे. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, कसे आहे मंदाकिनीची फिल्मी आणि खासगी आयुष्य...
बातम्या आणखी आहेत...