आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ranaragini Lodged A Complaint Against Ram Gopal Verma For Insulting Tweet On Women

वादग्रस्‍त ट्विटबद्दल रामगोपाल वर्माविरोधात तक्रार दाखल, रणरागिणी समितीने केली तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबई-  वादग्रस्‍त ट्विटमुळे सतत चर्चेत राहणारे रामगोपाल वर्मा पुन्‍हा एकदा वादात सापडले आहेत.  'माझी इच्‍छा आहे की, जगातील सर्व महिलांनी सनी लिओनीप्रमाणे पुरुषांना आनंद द्यावा', असा अजब सल्‍ला जागतिक महिलादिनीच महिलांना देऊन रामूने नवा वाद ओढवून घेतला आहे. रामूच्‍या या ट्विटनंतर गदारोळ निर्माण झाला आहे.  
 
हिंदू जनजागृती समितीची महिला शाखा असलेल्या रणरागिणी संघटनेने रामूच्‍या वक्‍तव्‍यावर आक्षेप घेत त्‍याचे ट्विटर अकांऊट ब्‍लॉक करण्‍यात यावे आणि महिलांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्‍याबद्दल रामूवर गुन्‍हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. त्‍याअनुसार संघटनेच्‍या विशाखा मह्म्‍बारे यांनी गोव्‍यातील मापुसा पोलिस स्‍टेशनमध्‍ये रामूविरोधात तक्रार दाखल केली आहे.   
 
याला उत्‍तर देताना रामूनेही आपल्‍या ट्विटचा चुकीचा अर्थ काढण्‍यात आला, असे सांगितले आहे. महिला संघटनांची माफीची मागणी धुडकावून लावत, 'उलट मीच सनी लिओनीच्‍या चाहत्‍यांच्‍या भावना दुखावल्‍याबद्दल संघटनेविरोधात तक्रार करणार आहे.', असे रामूने सांगितले. 

राम गोपाल वर्मांच्या वादग्रस्त ट्वीटची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकदा अशाप्रकारचे ट्वीट केले आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेता टायगर श्रॉफबद्दल रामूने वादग्रस्त ट्वीट केले होते.

पुढील स्‍लाइडवर पाहा, रामूचे वादग्रस्‍त ट्विट...  

  
बातम्या आणखी आहेत...