आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्ह बर्ड्स रणबीर आणि कतरिना येत्या नोव्हेंबरमध्ये अडकणार लग्नबंधनात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः रणबीर कपूर आणि कतरिना कैफ)
मुंबईः बॉलिवूडचे प्रसिद्ध लव्ह बर्ड्स रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हे दोघे यावर्षी नोव्हेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे.
रणबीर आणि कतरिना गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. दोघे लिव्ह इनमध्ये राहात असल्याचेही जगजाहीर आहे. मध्यंतरी या दोघांच्या साखरपुड्याची बातमीही आली होती. 30 डिसेंबर 2014 रोजी लंडनमध्ये दोघांनी साखरपुडा केला, अशी ती बातमी होती. या कार्यक्रमात रणबीरचे आईवडील नीतू सिंग आणि ऋषी कपूर यांचीही उपस्थिती होती. कतरिना ख्रिसमसाठी लंडनला गेली होती. तेथे रणबीर आपल्या आईवडिलांसोबत पोहोचला आणि दोन्ही कुटुंबाच्या परवानगीने दोघांनी साखरपुडा केला.
त्यानंतर काही दिवसांतच या कपलला मालदीवमध्ये सुटी एन्जॉय करताना बघितले गेले होते. शिवाय नववर्षाच्या निमित्ताने हे दोन्ही स्टार्स न्यूयॉर्कच्या एका हॉटेलमध्ये जल्लोष करतानाही दिसले होते.