आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'तमाशा\'चे शूटिंग संपताच रडले रणबीर-दीपिका, जाणून घ्या का?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी (5 ऑगस्ट) इम्तियाज अलीच्या 'तमाशा' सिनेमाच्या शूटिंगचा शेवटा दिवस होता. ड्रामा सिनेमाच्या दृश्यांपेक्षा जास्त कॅमे-याच्या मागे होत होता. मुंबईच्या मेहबूब स्टुडिओमध्ये शूट उरकून पूर्ण यूनिट भावूक झालेली दिसली.
विशेष म्हणजे, रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण. दोघे पूर्ण यूनिट समोर रडले. सेटवर उपस्थित एका सूत्राने सांगितले, की 'आमच्या शूटचा हा शेवटा दिवस होता आणि या दिवशी लोक भावूक होतात. परंतु ही घटना जरा वेगळीच होती. कारण यावेळी रणबीर-दीपिका दोघांनाही रडू कोसळले. आम्ही सर्वजण अचंबित झालो. कारण दोघे कधीच आपल्या भावना सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करत नाहीत.'
यूनिटच्या एका दुस-या सूत्राच्या सांगण्यानुसार, 'दोघे भावूक झाले कारण, दोघे प्रेमींपासून मित्र बनले आहेत आणि अजून आपले नाते त्यांना घट्ट वाटते. मात्र दोघांचे अफेअर इतर व्यक्तींसोबत आहे, मात्र दोघांना एकमेकांना गुडबाय म्हणणे कठिण होते. या सिनेमाला तयार करण्यासाठी तब्बल एक वर्ष लागला आणि पूर्ण टीम यावेळी भावूक झाली होती.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, स्टार-कास्ट आणि इतर मेंबर्सने सेटवर कसा वेळ घालवला...