आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir Proposes To Deepika In Final Shot Of 'Tamasha'

रणबीरने एक्स गर्लफ्रेंड दीपिकाला केले प्रपोज, पाहा तमाशा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('तमाशा' या आगामी सिनेमाच्या सेटवर रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण)
नवी दिल्लीः बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणची प्रपोजलची छायाचित्रे इंटरनेटवर लीक झाली आहेत. या छायाचित्रांमध्ये हँडसम ड्यूड रणबीर आपल्या एक्स गर्लफ्रेंडला चक्क प्रपोज करताना दिसतोय. आता तुम्ही म्हणाल, रणबीरचे सूत कतरिना कैफसोबत जुळले असताना मध्येच काय हा 'तमाशा' सुरु झाला आहे. अहो रणबीरने दीपिकाकडे आपल्या प्रेमाची कबुली दिली, हे खरे आहे. मात्र ट्विस्ट हा आहे, की त्याने खासगी आयुष्यात नव्हे तर एका सिनेमातील दृश्यात दीपिकाला प्रपोज केले आहे. त्यामुळे रणबीर आणि कतरिनामध्ये सर्वकाही आलबेल आहे, हे नक्की.
रणबीर आणि दीपिका सध्या इम्तियाज अलींच्या आगामी 'तमाशा' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. याच सिनेमातील एका सिक्वेन्समध्ये हे दृश्य चित्रीत करण्यात आले. याच चित्रीकरणाची छायाचित्रे सध्या इंटरनेटवर व्हायरल झाली आहेत.
रणबीर आणि दीपिकाचा हा तिसरा सिनेमा आहे. यापूर्वी हे दोघे 'बचना ए हसीनों' आणि 'ये जवानी है दीवानी' या सिनेमात हे दोघे एकत्र झळकले होते. विशेष म्हणजे हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजले होते. पडद्यावर या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पसंत पडले. एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या कपलचे ब्रेकअप झाले असून रणबीरच्या आयुष्यात कतरिनाची आणि दीपिकाच्या आयुष्यात रणवीर सिंहची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे या विभक्त झालेल्या कपलला आपल्या सिनेमात कास्ट करण्यासाठी निर्माता-दिग्दर्शकांना शर्थीचे प्रयत्न करावे लागतात, हे नक्की. रणबीर आणि दीपिकाचा 'तमाशा' हा सिनेमा यावर्षी डिसेंबर महिन्यात रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा चित्रीकरणादरम्यान क्लिक झालेली रणबीर आणि दीपिकाची ही खास छायाचित्रे...