आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'उडता पंजाब'च्या स्क्रिनिंगवेळी Ex-Girlfriend अवॉइड करताना दिसला रणबीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्क्रिनिंगदरम्यान रणबीर कपूर आणि कतरिना कैफ वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झाले. - Divya Marathi
स्क्रिनिंगदरम्यान रणबीर कपूर आणि कतरिना कैफ वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झाले.
मुंबई: कधीकाळी बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स म्हणून ओळखले जाणारे रणबीर कपूर आणि कतरिना कैफ ब्रेकअपनंतर एकमेकांना बघतसुध्दा नाहीत. गुरुवारी (16 जून) रात्री 'उडता पंजाब'च्या स्क्रिनिंगदरम्यान रणबीर कपूरने कतरिना कैफला अवॉइड केले. दोघांना सिनेमाच्या स्क्रिनिंगला आमंत्रित केले होते. दोघेही या स्क्रिनिंगला पोहोचले.
कॅटला अवॉइड करून दुसरीकडे गेला रणबीर...
रिपोर्ट्सनुसार, आलिया भटने ठेवलेल्या पर्सनल स्क्रिनिंगमध्ये निवडक स्टार्स पोहोचले होते. हे स्क्रिनिंग लाइटबॉक्स थिएटर आणि सनी सुपर साऊंडमध्ये होते. कॅटने लाइटबॉक्स थिएटरमध्ये स्क्रिनिंग अटेंड केली तसेच रणबीरने कतरिनाला अवॉइड करून सनी साऊंड थिएटरमध्ये सिनेमा पाहिला. सिनेमा पाहण्यासाठी रणबीरने वेगवेगळे ठिकाण निवडले.
2016च्या सुरुवातीपासून चर्चेत आहे रणबीर-कतरिनाचे ब्रेकअप...
- रणबीर आणि कतरिनाचे ब्रेकअप 2016च्या सुरुवातीपासून चर्चेत आहे.
- यापूर्वी 2015च्या अखेर त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु दोघांनी ख्रिसमस पार्टी एकत्र एन्जॉय केल्यानंतर यावर पूर्णविराम लागला होता.
- जानेवारीच्या पहिल्या आठवड्याच अचानक बातमी आली, की रणबीरने कतरिनासोबत राहत असलेला फ्लॅट सोडला. या फ्लॅटमध्ये दोघे सहा महिन्यांपासून लिव्ह-इनमध्ये राहत होते.
- त्यानंतर दोघांच्या गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झाल्या.
- असेच अनेक कारणे समोर आले, जे त्यांच्या ब्रेकअपचे संकेत देत होते. मात्र, रणबीर आणि कॅटपैकी कुणीच काही स्पष्टीकरण दिले नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'उडता पंजाब'च्या स्क्रिनिंगम्ये पोहोचलेल्या इतर सेलेब्सचे PHOTOS...