आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे ऋषी कपूर यांची लाडकी लेक, 5 वर्षांच्या डेटिंगनंतर थाटले बिझनेसमनसोबत लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचे प्रसिद्ध कपूर घराणे अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहे. या घराण्याच्या मुलींनीसुद्धा फिल्म इंडस्ट्रीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.  करिश्मा कपूर आणि करीना कपूर बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री ठरल्या. पण या घराण्यातील एक लेक मात्र फिल्म इंडस्ट्रीकडे वळली नाही. आम्ही बोलतोय ते ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची मुलगी आणि रणबीर कपूरची बहीण रिद्धीमा कपूर साहनी हिच्याविषयी.. 
 
करिश्मा आणि रिद्धीमात आहे केवळ सहा दिवसांचे अंतर... 
रिद्धीमा कपूर ही रणबीर कपूरची थोरली बहीण आहे. रिद्धीमा आणि तिची चुलत बहीण करिश्मा एकाच वयाच्या आहेत. या दोघींमध्ये केवळ सहा दिवसांचे अंतर आहे. दोघींच्या जन्माच्या वेळी राज कपूर म्हणाले होते, की माझ्या घरी रिद्धी-सिद्धी आल्या आहेत. त्यामुळे ऋषी कपूर यांनी त्यांच्या लेकीचे नाव रिद्धीमा असेल ठेवले. 
 
करिश्माचे डेब्यू झाले तेव्हा लंडनमध्ये होती रिद्धीमा... 
रिद्धीमाचे आईवडील फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार आहेत. घरी अॅक्टिंगचे वातावरण असूनदेखील रिद्धीमाला मात्र कधीही त्यात गोडी वाटली नाही. सिंगिंग, फॅशन आणि डिझायनिंग क्षेत्रात तिची करिअर करण्याची इच्छा होती. रिद्धीमा फॅशन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे. जेव्हा करिश्मा कपूरचे बॉलिवूडमध्ये पदार्पण झाले, तेव्हा रिद्धीमा लंडनमध्ये शिकत होती. 

पुढील स्लाईड्सवर.... पाच वर्षांच्या डेटिंगनंतर केले लग्न... 
बातम्या आणखी आहेत...