आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir Kapoor Has Made A Tattoo For Her Ladylove Katrina

रणबीरचे 'इजहार-ए-इश्क', कतरिनासाठी बनवला टॅटू!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूड स्टार्स टॅटूसाठी क्रेझी असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. अनेक स्टार्सनी आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी खास टॅटू बनवून घेतले आहेत.
आता रणबीर कपूरनेसुद्धा कतरिनावरचे आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी टॅटूची मदत घेतल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच त्याने आपल्या उजव्या हातावर क्रॉसचा टॅटू गोंदवून घेतला आहे. उजव्या हाताच्या करंगळीखाली तो तयार करण्यात आला आहे.
कतरिना ख्रिश्चन धर्मीय असल्याचे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. कदाचित कतरिनाला इम्प्रेस करण्यासाठी रणबीरने हा टॅटू गोंदवून घेतला असावा, असा अंदाज आहे. रणबीरने अलीकडेच हा टॅटू बनवून घेतल्याचे दिसून येते. कारण 27 एप्रिल रोजी त्याच्या आगामी बॉम्बे वेलवेट या सिनेमाचा दुसरा ट्रेलर लाँच करण्यात आला होता. यावेळी त्याच्या हातावर हा टॅटू दिसला नव्हता. म्हणजे गेल्या दोन-तीन दिवसांतच त्याने हा टॅटू बनवल्याचे स्पष्ट आहे.
फिल्म इंडस्ट्रीतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा टॅटू गोंदवून रणबीर खूप आनंदी आहे. मात्र हा परमनंट टॅटू आहे की नाही, हे कळू शकलेले नाही.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, रणबीरच्या हातावरचा हा नवीन टॅटू...