आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • When Ranbir Kapoor Wanted To Know How Would His Pairing With Ash Look On Screen.

17 वर्षांपूर्वी रणबीरने काढला होता ऐश्वर्यासोबत फोटो, विचारले होते, 'कशी दिसेल आमची जोडी'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या आगामी 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमात रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन ही जोडी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणारेय. रंजक गोष्ट म्हणजे या सिनेमामुळे रणबीरची 17 वर्षी जुनी इच्छा पूर्ण होतेय. ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमाची गाणी आणि ट्रेलर आल्यापासून सर्वच प्रेक्षकांना भुरळ पडली आहे. रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र झळकणारी ही जोडी या सिनेमात बोल्ड सीन देताना दिसतेय.

ही 17 वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी बॉलिवूड सुंदरी ऐश्वर्याने तिचे करियर सुरु केले होते. त्यावेळी रणबीर लहान होता. ऐश्वर्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली होती तर रणबीरला त्याचे बॉलिवूड करियर सुरु करण्यासाठी बरीच वर्षे बाकी होती. ऐश्वर्याने ‘आ अब लौट चले’ या सिनेमात झळकली होती. ऋषी कपूर यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला सिनेमा होता. तर रणबीर कपूर या सिनेमाचा सहायक दिग्दर्शक होता. त्याचवेळी ऐश्वर्या आणि रणबीरचा फोटो काढण्यात आला होता. 17 वर्षांपूर्वी काढलेला हा फोटो या दोघांच्याही चाहत्यांना आनंदाचा धक्का देणारा आहे. हा फोटो 'आ अब लौट चले' या सिनेमाचे लेखक रुमी जाफरी यांनी ट्विट केला असून त्यास कॅप्शनही दिलंय.
त्यांनी लिहिले, 'एक दिवस रणबीर माझ्याकडे आला आणि मला विचारले, ऐशसोबत माझी जोडी पडद्यावर कशी दिसले. म्हणून मी कॅमेरा घेतला आणि ऐश्वर्यासोबत त्याचा फोटो काढला. 17 वर्षांनंतर ही जोडी पडद्यावर एकत्र दिसेल, याचा विचार मी केला नव्हता. अमेरिकेत हा फोटो काढला होता. आता तुम्ही दोघंही एकत्र काम करत असून एकमेकांसोबत खूप छान दिसताय. तुमचा सिनेमा सुपरहिट व्हावा हिच शुभेच्छा.''

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमातील रणबीर आणि ऐश्वर्याची हॉट केमिस्ट्री...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...