आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्ट्रेसच्या विचित्र वागण्यामुळे पार्टी सोडून रणबीरने घेतला काढता पाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अॅक्ट्रेस अमिषा पटेल सध्या तिच्या काही विचित्र वागण्यामुळे चर्चेत आहे. एका प्रसिद्ध वेबसाईटच्या रिपोर्टनुसार नुकत्याच झालेल्या एका पार्टीमध्ये अमिषा पटेल आणि रणबीर कपूर उपस्थित होते. यावेळी अमिषाला रणबीरबरोबर काहीतरी प्रायव्हेट बोलायचे होते. त्यामुळे ती त्याला इशारे करून बोलवत होती. पण रणबीर इतर पाहुण्यांबरोबर व्यस्त होता, त्यामुळे त्याने अमिषाकडे लक्षच दिले नाही. 

अमिषापासून दूरच राहिला रणबीर.. 
- पार्टीदरम्यान रणबीर कपूर आमिषाला टाळत असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर रणबीर संधी मिळताच पार्टी सोडून निघून गेला. 
- रणधीर कपूरच्या 70व्या वाढदिवसाला अमिषाने रणबीरबरोबरचा तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला होता. त्यानंतर रणबीर आणि अमिषा यांच्या लिंकअपच्या चर्चा व्हायला लागल्या. पार्टीमध्ये अमिषा पटेल स्पेशल गेस्ट म्हणून सहभागी झाली होती. रणबीर कपूर सध्या संजय दत्तच्या बायोपिकचे शुटिंग करत आहे. 

पुढील स्लाइड्सवर रणबीर आणि अमिषा पटेल यांचे इतर काही PHOTOS..
 
बातम्या आणखी आहेत...