आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्टिंगच्या वेडाने या फेमस अॅक्टरने गाठली होती मुंबई, आईला वाटले फिरुन परतेल घरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक - रोहतक ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारा अभिनेता रणदीप हुड्डा आज आपला 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. रणदीपची हिरो बनण्याची कथा अत्यंत रंजक आहे. तो मुंबईला गेला तेव्हा काही दिवसांत परत येईल असे त्याच्या आईला वाटत होते. त्याच्या आईने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना हा किस्सा सांगितला. 

लहानपणी मस्तीखोर होता रणदीप 
- आशा हुड्डा यांनी सांगितले, ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर रणदीपने अभिनयासाठी मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी वाटले, तो काही दिवस मुंबई फिरेल आणि घरी परत येईल. 
- मात्र त्याचा मान्सून वेडिंग हा पहिला सिनेमा रिलीज झाला आणि आमचा विश्वास बसला, की तो अभिनयाच्या दुनियेतच नाव कमवेल. 
- बालपणीविषयीच्या आठवणींना उजाळा देताना आशा हुड्डा यांनी सांगितले, की रणदीप बालपणी अतिशय खट्याळ होता. 
- 10 पर्यंतचे शिक्षण सोनीपतच्या राई स्पोर्ट्स स्कूलमध्ये झाले. त्यानंतर दिल्लीत बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन तो उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेला.
- ऑस्ट्रेलियात बिझनेस मॅनेजमेंटच्या शिक्षणासोबतच त्याने मॉडेलिंगला सुरुवात केली. 
- त्यानंतर भारतात परतल्यानंतर विविध ठिकाणी ऑडिशन्स दिल्या आणि नसीरुद्दीन शाह यांच्या एका प्ले ग्रुपसोबत जुळून मुंबईत नाटकांमधून काम केले. येथेच त्याने अभिनयात नशीब आजमावले. 
 
आजीच्या हातचा चुरमा आवडतो 
- रणदीपला त्याच्या आजी (वडिलांची आई)च्या हातचा चुरमा आणि आईच्या हातची खीर पसंत आहे. 
- आशा हुड्डा सांगतात, रणदीप मुंबईहून घरी आल्यानंतर त्यांना आवर्जुन खीर बनवायला सांगतो. 
आईची इच्छा, मुलाने करावे लग्न...
- आशा हुड्डा सांगतात, की रणदीपने लग्न करावे, अशी माझी खूप इच्छा आहे. मात्र अद्याप तो लग्नसाठी तयार होत नाहीये. 

 रणदीपचे वडील आणि बहीण आहे डॉक्टर 
- रणदीपचे वडील रणबीर हुड्डा डॉक्टर तर आई शिक्षिका आहेत. 
- रणदीपला एक मोठी बहीण असून अजंली हे तिचे नाव आहे. अंजली डॉक्टर आणि भाऊ संदीप हुड्डा सिंगापूरच्या एका बँकेत व्हाइस प्रेसिडेंट आहे. 
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, रणदीप हुड्डाचे निवडक फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...