आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षांत एवढा बदलला आमिर, आता अशी दिसते 'रंग दे बसंती'ची स्टार कास्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 2006 मध्ये रिलीज झालेल्या दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरांच्या रंग दे बसंती या सिनेमाच्या रिलीजला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. तरुणांमध्ये देशभक्ति जागवणा-या या सिनेमाला समीक्षक आणि प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते.
7 फिल्मफेअर आणि 1 नॅशनल अवॉर्ड
या सुपरडुपर हिट सिनेमाला 7 फिल्मफेअर आणि एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याशिवाय 8 स्क्रिन अवॉर्ड्स, 8 ग्लोबल इंडियन फिल्म अवॉर्ड्स आणि 4 आयफा अवॉर्ड्स या सिनेमाने आपल्या नावी केले होते.
बदलला स्टारकास्टचा लूक
या सिनेमात आमिर खान, आर. माधवन, सोहा अली खान, अतुल कुलकर्णी, कुणाल कपूर, सिद्धार्थ आणि शर्मन जोशी लीड रोलमध्ये होते. गेल्या दहा वर्षांत या सिनेमाच्या संपूर्ण स्टारकास्टमध्ये वाढत्या वयानुसार बराच बदल झालेला दिसून येतोय.
आमिर खान
भूमिका- दलजीत उर्फ डीजे
आमिर खान सध्या त्याच्या आगामी दंगल या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमासाठी त्याने आपले बरेच वजन वाढवले. त्यामुळे त्याचा लूक पूर्ण बदलला आहे. 2014मध्ये आलेला पीके हा त्याचा शेवटचा रिलीज झालेला सिनेमा आहे. गेल्यावर्षी त्याचा एकही सिनेमा रिलीज झाला नव्हता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, किती बदलली सिनेमाची स्टारकास्ट...