आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rani Is Karan Johar\'s Sister In Law Famous Celebrity Relatives

करण जोहरची वहिनी आहे राणी मुखर्जी, जाणून घ्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या नातेसंबंधांविषयी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये प्रत्येकजण एकमेकांशी कनेक्ट आहे. कुणाचे मैत्रीचे संबंध आहेत. काहींचे नाते प्रेमाचे आहे, तर काहींमध्ये शत्रुत्व आहे. मात्र बॉलिवूडमध्ये काही कुटुंब अशी आहेत, ज्यांचे एकमेकांशी कौटुंबिक संबंध आहेत. या नात्यांविषयीत्यांच्या चाहत्यांना फार काही ठाऊक नाहीये.
अभिनेत्री काजोल दिवंगत अभिनेत्री नूतनची भाची आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का? काजेल अभिनेता मोहनीश बहलची बहीण आहे. मोहनीश बहल नूतनचा मुलगा आहे. नूतन आणि काजोलची आई तनुजा सख्या बहिणी होत्या. याशिवाय काजोल आणि राणी मुखर्जी चुलत बहिणी आहेत. तर संजय दत्तची बहीण नम्रता दत्त ज्युबली स्टार राजेंद्र कुमार यांची सून आणि कुमार गौरवची पत्नी आहे.
यश चोप्रा करण जोहरचे मामा होते. करण जोहरची आई हीरु जोहर निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांची धाकटी बहीण आहे. याचा अर्थ म्हणजे आदित्य चोप्रा आणि करण जोहर भाऊ असून आदित्यची पत्नी राणी मुखर्जी करण जोहरची वहिनी आहे. अशाप्रकारे बॉलिवूडमध्ये प्रत्येकाचे कुणाशी कोणते तरी नातेसंबंध नक्की आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, बी टाऊनमधील अशाच आणखी काही नातेसंबंधांविषयी...