आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'DDD'मध्ये रणवीर-अनुष्काचा रोमँटिक केमिस्ट्री, दीपिका-विराट होतील जेलस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('पहली बार' या गाण्यातील अनुष्का आणि रणवीरचा रोमँटिक अंदाज)
बहुप्रतिक्षित 'दिल धडकने दो' हा सिनेमा आज बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. मल्टिस्टारर या सिनेमात रणवीर सिंह आणि अनुष्का शर्मा प्रियकर-प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'बँड बाजा बारात' आणि 'लेडीज वर्सेस रिकी बहल' या सिनेमांनंतर पुन्हा एकदा रणवीर आणि अनुष्काची हॉट केमिस्ट्री प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे.
'दिल धडकने दो' या सिनेमातील 'पहली बार' या गाण्यात दोघांची हॉट केमिस्ट्री प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहे. या गाण्यात रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा डान्स करतानाचा सीन आहे. यामध्ये दोघे सिझलिंग रोमान्स करताना दिसत आहेत. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे या गाण्याची कोरिओग्राफी स्वत: रणवीर आणि अनुष्काने केली आहे. सुकृती कक्कड आणि सिद्धार्थ महादेवन यांनी हे गाणं गायलंय, तर शंकर एहसान लॉय हे या गाण्याचे संगीतकार आहेत.
या गाण्यातील रणवीर-अनुष्काचा हॉट अंदाज बघून रणवीरची गर्लफ्रेंड दीपिका पदुकोण आणि अनुष्काचा बॉयफ्रेंड विराट कोहली जेलस फिल करतील, असं म्हटलं तर वावगं ठरु नये.
पुढील स्लाईड्समध्ये तुम्हीही पाहा, रणवीर-अनुष्काच्या सिझलिंग केमिस्ट्रीची खास झलक छायाचित्रांमध्ये...