आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: पार्टीज आणि इव्हेंट्समध्ये अशा विचित्र आउटफिट्समध्ये दिसतो रणवीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[फाइल फोटो :एका पार्टीत (डावीकडे) आणि GQ बेस्ट ड्रेस्ड मॅन अवॉर्ड्स 2015मध्ये रणवीर सिंह]
मुंबईः बॉलिवूड अभिनेता रणवीरने सिंह 30 वर्षांचा झाला आहे. 6 जुलै 1985 रोजी मुंबईत जन्मलेल्या रणवीरने 2010 मध्ये बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली. त्याला पहिला ब्रेक हा दिग्दर्शक मनीष शर्मांच्या' बँड बाजा बारात' या सिनेमाद्वारे मिळाला होता. हा सिनेमा आदित्य चोप्रा यांनी निर्मित केला होता. अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी त्याला मिळाली होती. सिनेमा सुपरहिट ठरला आणि रणवीरला पहिल्याच सिनेमात यशाची चव चाखायला मिळाली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. 'बँड बाजा बारात'नंतर 'लेडीज वर्सेस रिकी बहल' (2011), 'लुटेरा' (2013), 'गोलियों की रासलीला : राम-लीला' (2013), 'गुंडे' (2014), 'फायंडिंग फॅनी' (2014) आणि 'दिल धडकने दो' (2015) यांसारख्या सिनेमांमध्ये रणवीरने आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले.
सिनेमातील एन्ट्रीसोबतच रणवीर सर्वांचे लक्ष वेधून घेतो, ते आपल्या लूक्सने. तो नेहमीच आपल्या लूकविषयी प्रॅक्टिकल असतो. 'बँड बाजा बारात'मध्ये तो क्लिन शेव्हमध्ये दिसला, तर 'गोलियों की रासलीलाः रामलीला' आणि 'गुंडे'मध्ये त्याचा मिशीतील अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला. इतकेच नाही तर आपल्या आगामी बाजीराव मस्तानी या सिनेमात त्याला बाल्ड लूक बघायला मिळणारेय.
असो, हे तर झाले रणवीरच्या रिल लाइफमधील लूक्सविषयी. खासगी आयुष्यातदेखील आपल्याला त्याचा वेगवेगळा अंदाज बघायला मिळत असतो. विशेषतः आपल्या चित्रविचित्र आउटफिट्समुळे रणवीर चर्चेत असतो. आउटिंगपासून ते पार्टी आणि इव्हेंट्सपर्यंत रणवीरची कपड्यांची विचित्र स्टाइल लक्ष वेधून घेणारी असते.
Divyamarathi.com तुम्हाला रणवीरचे असेच काही विचित्र अंदाज दाखवत आहे...