आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीरने खरेदी केले स्वतःचे घर, आईवडिलांचे घर सोडून गोरेगावला झाला शिफ्ट!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने वांद्र्यातील त्याचे आईवडिलांचे घर सोडले असून तो आता गोरेगावला शिफ्ट झाला आहे. गोरेगावमध्ये रणवीरने स्वतःचा फ्लॅट खरेदी केला आहे. खरं तर रणवीर दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या आगामी 'बाजीराव मस्तानी' या सिनेमासाठी गोरेगाव येथे शिफ्ट झाला आहे.
त्याचे कारण म्हणजे अलीकडेच रणवीरच्या खांद्याची सर्जरी झाली आहे. डॉक्टरांनी त्याला हळू चालणे आणि अॅक्शन सीन्स न करण्याचा सल्ला दिला आहे. शेड्युलला उशीर होऊ नये यासाठी रणवीरने सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. तो आता 12 तास शूटिंग आणि चार तास फिजिओथेरपी करणार आहे. हे सर्व सांभाळणे त्याला कठीण होत आहे.
रणवीरच्या वांद्र्यास्थित घरापासून गोरेगाव फिल्म सिटी 20 किमी अंतरावर आहे. मात्र पाऊस आणि ट्रॅफिकमुळे हे अंतर कापायला दीड तासांहून अधिक वेळ लागतो. त्यामुळे त्याने गोरेगावमध्ये घर घेतले असून फिल्म सिटीपासून ते केवळ पाच मिनिटांच्या अंतरावर आहे.
'बाजीराव मस्तानी'मध्ये रणवीरसह दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा मेन लीडमध्ये आहेत. जानेवारी 2016 मध्ये हा सिनेमा रिलीज होणारेय.