आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranveer Vaani Lip Lock In Befikre First Look, See Bold Bollywood Films Posters

\'बेफिक्रे\'च्या पोस्टवर रणवीर-वाणीचा बोल्ड अंदाज, पाहा बॉलिवूड फिल्म्सचे सर्वाधिक भडक पोस्टर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या ‘बेफिक्रे’ सिनेमाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये रणवीर आणि वाणीचा ‘लिप लॉक’ दाखवण्यात आलेला आहे. ‘बेफिक्रे’ सिनेमाद्वारे या दोघांची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. रणवीरने हे पोस्टर ट्विट केले आहे. तसेच, त्याने एका ट्विट म्हटलेय की, प्रेम करण्याची हिम्मत करणा-यांपैकी तुम्ही जर असाल तर तुम्हाला हे नक्कीच आवडेल. आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘ब्रेफिक्रे’ सिनेमा 9 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात रणवीर आणि वाणी यांच्यावर एक दोन नव्हे तर तब्बल 23 किसींग सीन्स चित्रीत करण्यात येणार आहेत. एकंदरीतच काय तर सिनेमाचे बोल्ड पोस्टर आणि त्याविषयीची उघड झालेली माहिती बघता हा सिनेमा रणवीर आणि वाणी यांच्या करिअरमधील बोल्ड सिनेमा म्हणून गणला जाईल, असे दिसतंय.
तसे पाहता प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी निर्माते-दिग्दर्शक फार पूर्वीपासून बोल्ड पोस्टर्सची मदत घेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेकदा वादांनाही तोंड फुटले आहे. ‘3 जी’, ‘हेट स्टोरी’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘जोडी ब्रेकर्स’, ‘जिस्म 2’, ‘मर्डर 2’, ‘साहिब बीवी और गँगस्टर’, ‘काइट्स’, ‘राज’, ‘कुर्बान’, ‘आशिक बनाया आपने’, ‘ब्लड मनी’, ‘द डर्टी बॉलिवूड बॅचलर’, ‘हैलो...कौन है’, ‘हीरोइन’, ‘हिस्स’, ‘इंकार’, ‘जूली’, ‘मरेगा साला’, ‘रागिनी MMS 2’, ‘मर्डर 3’, ‘नशा’, ‘निशब्द’, ‘प्लेयर्स’, ‘प्यार के साइड इफेक्ट्स’, ‘राज 3’, ‘रेड’, ‘कौन है वहां’ यांसारख्या सिनेमांचे पोस्टर्स बरेच बोल्ड बनवण्यात आले होते. काही सिनेमांचा अपवाद वगळता बोल्ड पोस्टर्स सिनेमा हिट करण्यात अयशस्वी ठरले होते.
खरं तर पूर्वीच्या काळी ए ग्रेड सिनेमांचे पोस्टर्स बोल्ड असायचे. मात्र आता बॉलिवूडमधील सामान्य सिनेमांचेही पोस्टर्स बोल्ड दिसू लागले आहेत. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही बोल्ड पोस्टर असलेल्या सिनेमांविषयी सांगत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या या बोल्ड पोस्टर्स असलेल्या सिनेमांविषयी..