आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : बालपणी असा दिसायचा 'जग्गा जासूस', अशी करायचा धमाल, पाहा Rare Pics

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा आज वाढदिवस आहे. 28 सप्टेंबर 1982 रोजी रणबीरचा चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठे कुटुंब असलेल्या कपूर कुटुंबात जन्म झाला. रणबीरच्या वाढदिवसाचे औचित्य साधत divyamarathi.com वाचकांना त्याची खास छायाचित्रे दाखवत आहे. रणबीरची ही छायाचित्रे कदाचितच तुम्ही यापूर्वी बघितली असावीत.
 
पुढील स्लाईड्समध्ये तुम्ही घरापासून ते शाळेपर्यंत आणि आउटिंगवरील रणबीरची वेगवेगळ्या वयातील आणि अंदाजीतल छायाचित्रे बघाल. ही छायाचित्रे रणबीर कपूर डॉट नेटवरुन घेण्यात आली आहेत. रणबीर कपूर घराण्यातील चौथी पिढी आहे. संजय लीला भन्साळींच्या 'सावरियां' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात करणा-या रणबीरने अल्पावधीतच स्टारडम प्राप्त केले. तो आज बॉलिवूडमधील मोस्ट डिमांडिंग हीरो ठरला आहे.
 
एखाद्या सिनेमात त्याचे असणे यशाची गॅरंटी बनले आहे. रणबीरने कमर्शिअल सिनेमांसोबतच ऑफबीट कलात्मक सिनेमांमध्येही आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली आहे. आत्तापर्यंतच्या आपल्या करिअरमध्ये रणबीरने अनेक महत्त्वपूर्ण अवॉर्ड नावी केले आहेत. त्याच्या खात्यात अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे जमा आहेत. 

रणबीरचे बालपणीचे फोटो पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर... 
बातम्या आणखी आहेत...