आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीना नव्हे, जेव्हा अमृताचा नवरा होता सैफ अली खान, बघा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे - अमृता सिंहसोबत सैफ, उजवीकडे (वर) - मुलगा तैमूर आणि करीनासोबत सैफ आणि (खाली) - अमृतासोबत सैफ अली खान - Divya Marathi
डावीकडे - अमृता सिंहसोबत सैफ, उजवीकडे (वर) - मुलगा तैमूर आणि करीनासोबत सैफ आणि (खाली) - अमृतासोबत सैफ अली खान
एन्टरटेन्मेंट डेस्कः आईवडील झाल्यानंतर याकाळात सैफ अली खान आणि करीना कपूर भरपूर पार्टीज एन्जॉय करत आहेत. अलीकडेच करीनाचे वडील रणधीर कपूर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत करिश्मा, रणबीर कपूर, सैफ आणि त्याची मुलगी सारा अली खानसह संपूर्ण कपूर कुटुंब एकत्र आलं होतं. याशिवाय सैफ आणि करीनाला 'रंगून' या सिनेमाच्या स्क्रिनिंगलाही एकत्र पाहिले गेले. 
 
करीनाने सैफ अली खानसोबत 16 ऑक्टोबर 2012 रोजी लग्न केले. 20 डिसेंबर 2016 रोजी करीनाने मुलगा तैमूरला जन्म दिला. करीना ही सैफची दुसरी पत्नी आहे. अमृता सिंह हे त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव आहे. 

वयाच्या 21 व्या वर्षी थाटले होते सैफने पहिले लग्न... 
ऑक्टोबर 1991मध्ये सैफ आणि अमृता यांच्या लग्नाच्या वेळी सैफ केवळ 21 वर्षांचा होता. तेव्हा सैफचे करिअरसुद्धा सुरु झाले नव्हते. बातम्यांनुसार, सैफचे कुटुंबीय या लग्नाच्या विरोधात होते. लग्नानंतर सैफ अनेक वर्षे अमृतासोबत तिच्या घरीच राहिला. दोघांना सारा आणि अब्राहम ही दोन मुले आहेत. 13 वर्षे या दोघांचा संसार टिकला. मात्र 2004 साली सैफ आणि अमृता घटस्फोट घेऊन विभक्त झाले.
 
असे म्हटले जाते, की सैफचे इटालियन गर्ल रोजा कॅटलानोबरोबर अफेअर सुरु झाल्यानंतर अमृताने त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र हे दोघे विभक्त झाले असले तरीदेखील आजही अमृताला आपण विसरु शकलो नसल्याचे सैफने एका मुलाखतीत म्हटले होते. तर 2005 साली अमृता सिंगने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, घटस्फोटाचे कारण फक्त मला आणि सैफलाच ठाऊक आहे आणि शेवटपर्यंत यामागचे सत्य फक्त आमच्यातच राहिलं. करीना आणि सैफच्या पहिल्या पत्नीच्या मुलांमध्ये फ्रेंडली रिलेशन आहेत.

पुढील स्लाईड्सवर बघा, सैफ-अमृताची काही जुनी छायाचित्रे...  
बातम्या आणखी आहेत...