आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

70 वर्षांचे झाले शत्रुघ्न सिन्हा, पाहा त्यांच्या आयुष्यातील न पाहिलेले काही क्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरती डावीकडून, एक मित्रा, अमिताभ बच्चन आणि जया बच्चनसोबत शत्रुघ्न सिन्हा. खाली डावीकडून, पत्नी पूनम, मित्र अमिताभ बच्चन आणि मुलगी सोनाक्षी सिन्हासोबत शत्रुघ्न सिन्हा - Divya Marathi
वरती डावीकडून, एक मित्रा, अमिताभ बच्चन आणि जया बच्चनसोबत शत्रुघ्न सिन्हा. खाली डावीकडून, पत्नी पूनम, मित्र अमिताभ बच्चन आणि मुलगी सोनाक्षी सिन्हासोबत शत्रुघ्न सिन्हा
मुंबई- बॉलिवूड अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा 70 वर्षांचे झाले आहेत. 9 डिसेंबर 1945ला त्यांचा जन्म पटना बिहारमध्ये झाला होता. वयाच्या 24व्या वर्षी त्यांचा 'साजन' हा पहिला सिनेमा रिलीज झाला होता. त्यांनी आपल्या संपूर्ण करिअरमध्ये 180पेक्षा जास्त सिनेमे केले आहेत. त्यामध्ये, 'मेरे अपने' (1971), 'रामपुर का लक्ष्मण' (1972), 'दोस्त' (1974), 'विश्वनाथ' (1978), 'नरम गरम' (1981), 'खून भरी मांग' (1988), बेताज बादशाह' (1994), 'आन : मैन एट वर्क' (2004), और 'रक्त चरित्र' (2010) सारखे अनेक सिनेमे लोकप्रिय झालेत.
शत्रुघ्न यांनी अभिनेते व्हावा अशी वडिलांची नव्हती इच्छा-
शत्रुघ्न सिन्हा यांच्या वडिलांची इच्छा नव्हती, की त्यांनी अभिनेता व्हावे. त्यांना वाटायचे, की शत्रुघ्न यांनी डॉक्टर किंवा वैज्ञानिक व्हावे. परंतु शत्रुघ्न सिन्हा यांना या दोन्ही क्षेत्रात रुची नव्हती. एकेदिवशी शत्रुघ्न यांनी वडिलांना न सांगत पुण्याच्या फिल्म इंडस्टीस्ट्युडमध्ये प्रवेश फॉर्म भरला. परंतु वडिलांनी त्यावर सही करण्यास नकार दिला. त्यावेळी त्यांचे मोठे भाऊ लखन यांनी फॉर्मवर सही केली आणि त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यांचा सर्वात मोठा भाऊ राम अमेरिकेत शास्त्रज्ञ आहे. दुसरा भाऊ लखन इंजिनिअर आहे आणि तिसरा भाऊ लंडनमध्ये डॉक्टर आहे. त्यांची थोरली बहीण अन्नपूर्णा पाटणामध्ये राहते, तिथे शत्रुघ्न यांचे पुस्तैनी घरसुध्दा आहे.
अमिताभ बच्चन आहेत चांगले मित्र-
शत्रुघ्न सिन्हा आणि अमिताभ बच्चन चांगले मित्र आहेत. दोघांनी 'काला पत्थर', 'दोस्ताना', 'शान' तथा 'नसीब' सारख्या अनेक सिनेमांत एकत्र काम केले. मध्यंतरी त्यांच्या अनेकदा मतभेद निर्माण झाले होते. एकेकाळी शत्रुघ्न यांची लोकप्रियता पाहून अमिताभ यांना आपल्या स्टारडमची चिंता सतावत होती. त्यांनी शत्रुघ्न यांच्यासोबत सिनेमे करण्यासुध्दा नकार दिला होता. मात्र आता ते एकमेकांना भेटतात, बोलतात आणि चांगले मित्रदेखील आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शत्रुघ्न सिन्हा यांच्या आयुष्यातील न पाहिलेले फोटो...
बातम्या आणखी आहेत...