प्रियांका चोप्रा 35 वर्षांची (18 जुलै) झाली आहे. 1982 ला जमशेदपूरमध्ये जन्मलेली प्रियांका वयाच्या 13 व्या वर्षी शिकण्यासाठी बोस्टनला गेली होती. तीन वर्षांनंतर ती परतली आणि बरेलीच्या आर्मी स्कूलमधून हाय स्कूलची परीक्षा पास केली. लहानपणी तिला सर्व 'काली-कलुटी' म्हणून चिढवायचे. लहानपणी ती सावळी होती. तिला तिच्या नाकामुळे आणि सावळ्या रंगामुळे लोकांचे टोमणे ऐकावे लागत होते. मॉडलिंग डेजमध्येही प्रियांकाचा लूक म्हणावा तेवढा ग्लॅमरस नव्हता. पण आता ती फारच ग्लॅमरस दिसते. पण आपण आज प्रियांकाचे असे काही फोटोज पाहणार आहोत, ते कोणालाही दाखवण्याची तिची इच्छा नसेल.
आईच्या एका निर्णयाने बदलले जीवन..
प्रियांका विदेशातून परतली तेव्हा तिची एक आंटी तिला काली कलुटी म्हणून चिढवायची. त्यामुळे प्रियांकाचा आत्मविश्वास डळमळू लागला. दुसरीकडे तिचे वडील हायर स्टडीजसाठी तिला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची तयारी करू लागले. पण तेव्हा तिच्या आईने असे पाऊल उचलले की, प्रियांकाचे जीवनच बदलून गेले. विद्यापीठात प्रवेश घेताना प्रियांकाने काढलेला पासपोर्ट साईज फोटो तिच्या आईने मिस इंडिया कॉन्टेस्टसाठी पाठवला. याबाबत प्रियांकाच्या आईने कोणालाही काहीही सांगितले नाही.
मिस वर्ल्ड जिंकून बनली बॉलिवूड क्वीन..
प्रियंकाच्या आईने पाठवलेले फोटो पाहून प्रियांकाची निवड झाली. एकदिवस प्रियांकाचे स्पर्धेत सलेक्शन झाल्याचा फोन आला. त्यानंतर सर्वांना याबाबत समजले. प्रियांका स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर राहिली. पण त्याचवर्षी ती मिस वर्ल्डचा किताब जिंकली. त्यानंतर ती चित्रपटांकडे वळाली.
या चित्रपटांत केले काम
प्रियांकाने 'द हिरो' (2003), 'अंदाज' (2003), 'प्लान' (2004), 'एतराज' (2004), 'क्रिश' (2006), 'फॅशन' (2008), 'कमिने' (2009), 'डॉन 2' (2011), 'अग्निपथ' (2012), 'बर्फी' (2012), 'जंजीर' (2013), 'मैरी कॉम' (2014), 'दिल धडकने दो' (2015), 'बाजीराव मस्तानी' (2015) सह इतर चित्रपटांत काम केले आहे. त्याशिवाय प्रियांकाने हॉलिवूड चित्रपटांत काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, प्रियांकाचे काही विचित्र PHOTOS..