मुंबईः सुपरस्टार सलमान खान सध्या लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत आला आहे. कथित गर्लफ्रेंड लुलिया वंतूरसोबत सलमानने रोमानियात साखरपुडा केल्याची बातमी अलीकडेच आली होती. मात्र साखरपुड्याची बातमी खोटी असून अशा बातम्यांवर विश्वास ठेऊ नका, असे सलमानची लाडकी बहीण अर्पिता खानने स्पष्ट केले आहे.
चर्चेचे दुसरे कारण म्हणजे, सलमानचे एक अतिशय जुने छायाचित्र सध्या सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायर झाले आहे. या छायाचित्रात सलमान त्याचे दोन्ही भाऊ सोहेल आणि अरबाद, त्यांच्या पत्नी सीमा खान आणि मलायका अरोरा खान आणि मुले दिसत आहेत. या छायाचित्रात सलमानच्या दोन्ही बहिणीसुद्धा दिसत आहेत. हे छायाचित्र समुद्रकिना-यावर क्लिक करणअयात आले आहे. तसे पाहता, सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांचे रेअर फोटोज अधूनमधून इंटरनेटवर येत असतात.
divyamarathi.com ने सलमानच्या अशाच काही जुन्या छायाचित्रांचे कलेक्शन केले आहे. त्याची ही अतिशय जुनी अशी छायाचित्रे तुम्ही पुढील स्लाईड्मध्ये पाहू शकता. यापैकी काही छायाचित्रांमध्ये सलमान आणि सोहेल सहकलाकार आणि फ्रेंड्ससोबत दिसत आहेत...