आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics : बिग बींसाठी चाहत्यांनी देव ठेवले होते पाण्यात, भेटायला आल्या होत्या इंदिरा गांधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन गेल्या अनेक दशकांपासून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. 'सात हिंदुस्थानी' चित्रपटापासून 1969 मध्ये सुरू झालेला बिग बींचा प्रवास आजही सुरुच आहे. पण 1982 च्या दरम्यान एक काळ असा आला होता, जेव्हा बिग बींना आता परत कधीही पडद्यावर पाहता येणार नाही अशी भिती निर्माण झाली होती. ती घटना म्हणजे 'कुली' चित्रपटाच्या सेटवर झालेल्या दुर्घटनेत बिग बींच्या पोटाच्या अंतर्गत भागात झालेली जखम. त्यामुळे सुमारे आठवडाभर बिग बी रुग्णालयात दाखल होते. रुग्णालयातून सुटी होऊन आजच्याच दिवशी (2 ऑगस्ट 1982) बिग बी घरी आले होते. बिग बींसाठी त्यावेळी चाहत्यांनी अक्षरशः देव पाण्यात ठेवले होते. इंदिरा गांधीही त्यावेळी तातडीने दौरा आटोपून बिग बींना भेटायला पोहोचल्या होत्या. अनेक सेलिब्रिटींची तेव्हा रुग्णालयाबाहेर गर्दी असायची. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, अमिताभ बच्चन यांचे या घटनेनंतरचे काही PHOTOS 
बातम्या आणखी आहेत...