आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कशी झाली होती लता यांच्यासोबत रजनीकांत यांची पहिली भेट, जाणून घ्या आणि पाहा Rare Pics

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 65 वर्षे पूर्ण केली आहेत. यंदाचा वाढदिवस रजनीकांत साजरा करणार नाहीयेत. तामिळनाडूत आलेल्या पुरामुळे त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले आहे. आपला वाढदिवस साजरा करण्यापेक्षा राज्याला मदत करणे जास्त महत्वाचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पुरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी रजनी यांच्यासोबत त्यांच्या पत्नी लता पुढे आल्या आहेत. त्यांनी पुरग्रस्तांना आवश्यक दैनंदिन वस्तूंचे वाटप केले आहे.
रजनीकांत यांच्या पत्नी लता नेहमीच त्यांच्यासोबत दिसतात. या दाम्पत्याच्या लग्नाला 34 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र रजनीकांत आणि लता यांची पहिली भेट कशी झाली, ते लग्नाच्या बेडीत कसे अडकले, याविषयी कदाचितच त्यांच्या चाहत्यांना ठाऊक असावे...जाणून घेऊया रजनीकांत आणि लता यांच्या लव्हस्टोरीविषयी...
लता रंगाचारी तामिळ असून चेन्नईत त्यांचा जन्म झाला. लता रजनीकांत यांनी चेन्नईतून इंग्रजी साहित्यात मास्टर डिग्री प्राप्त केली आहे. चेन्नईतील वुमन कॉलेजमध्ये शिकत असताना कॉलेज मॅगझिनसाठी लता यांनी रजनीकांत यांची मुलाखत घेतली होती. हीच रजनीकांत आणि लता यांची पहिली भेट होती. त्यानंतर त्यांच्यात सूत जुळले आणि 26 फेब्रुवारी 1981 रोजी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे त्यांनी लग्न केले. लता 80 च्या दशकामध्ये गायिका म्हणून हिंदी सिनेमांशी जोडलेल्या होत्या. त्या गायिकेसोबतच निर्मात्यासुद्धा आहे. याशिवाय त्या 'द आश्रम' या शाळेच्या संचालिका आहेत. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. सौंदर्या आणि ऐश्वर्या ही त्यांची नावे आहेत. ऐश्वर्या हिचे लग्न दाक्षिणात्य अभिनेता धनूषसोबत झाले आहे. तर सौंदर्याचे लग्न व्यावसायिक असलेल्या अश्विन रामकुमारसोबत झाले आहे.
एक नजर टाकुया रजनीकांत आणि लता यांच्या खास छायाचित्रांवर...
बातम्या आणखी आहेत...