आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे रवीना टंडनचा Sea-Facing बंगला 'नीलया', बघा आलिशान बंगल्याचे INSIDE PICS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडची A लिस्टर अॅक्ट्रेसमध्ये गणली जाणारी अभिनेत्री रवीना टंडन २६ ऑक्टोबर रोजी आपला ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. २६ ऑक्टोबर १९७४ रोजी जन्मलेली रवीना मुंबईतील वांद्रा येथे वास्तव्याला आहे. रवीनाने चित्रपट वितरक अनिल थडानीसोबत लग्न झाले असून तिला दोन मुले आहेत. राशा हे तिच्या मुलीचे तर रणबीरवर्धन हे मुलाचे नाव आहे. लग्नानंतर रवीनाने बॉलिवूडमध्ये काम कमी केले आणि ज्वेलरी डिझायनिंगच्या बिझनेसकडे वळली. नवरा आणि दोन्ही मुलांसोबत ती मुंबईतील वांद्रास्थित एका आलिशान बंगल्यात वास्तव्याला आहे. या बंगल्याचे नाव आहे 'नीलाया'.

निसर्गाशी जवळीक साधणारे घर रवीना आणि तिच्या पतीने डिझाइन करुन घेतले. रवीनाच्या घरात आर्टिस्टिक विचारांची झलक बघायला मिळते. काही दिवसांपूर्वी divyamarathi.comला दिलेल्या मुलाखतीत रविनाने आपल्या बंगल्यातील इंटेरियरविषयी सांगितले.
Neelaya Like Kerala Homes: मुंबईतील वांद्रा परिसरात असलेल्या रवीनाच्या घरी जेव्हा आम्ही पोहोचले, तेव्हा या कलाप्रेमी अभिनेत्रीच्या क्लासिक चॉईसची झलक बघायला मिळाली. आपल्या घराविषयी रवीनाने सांगितले, "मला माझ्या बंगल्यात फ्यूजन हवे होते. केरळ येथील घरांप्रमाणे मला माझे घर सजवायचे होते. तेथूनच प्रेरणा घेऊन मी माझे घर डिझाइन केले आहे."
Sacred Space: निसर्गाशी जवळीक साधणारे रवीनाचे घर आहे. घराच्या आत प्रवेश करताच चोहोबाजुंनी हिरवळ बघायला मिळते. आउटविषयी सांगायचे झाल्यास, काळ्या, लाल आणि ग्रे दगडांनी घराबाहेरील भाग सुशोभित करण्यात आला आहे. येथे एक मंदिरसुद्धा आहे. रवीनाची घरातील ही आवडती जागा आहे. वास्तूशास्त्रानुसार हे मंदिर बनवण्यात आले आहे. सूर्यप्रकाश थेट येऊ शकेल, अशा पद्धतीने मंदिराची रचना करण्यात आली आहे. प्रवेशद्वाराजवळीक श्रीगणेशाची आकर्षक मुर्ती लक्ष वेधून घेते.

Peaceful: रवीना सांगते, ''खरं तर मुंबईसारख्या शहरांमध्ये क्वचितच हिरवळ बघायला मिळते. तुम्हाला मोठ्या प्रमाणात वृक्ष बघायला मिळत नाही, शिवाय पक्ष्यांची किलकिलाट ऐकू येत नाही. मात्र माझ्या घरात तुम्ही पक्ष्यांची किलकिलाट सहज ऐकू शकतात. हाच अनुभव मला नेहमीपासून हवा होता. सकाळी उठल्यानंतर खिडकीतून हिरवळ आणि फुल बघण्याचे माझे स्वप्न होते. तसे घर आज माझ्याजवळ आहे."

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, रवीना टंडनच्या ड्रीम हाऊसची खास झलक...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...