आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Raveena Tandon Sister In Law Rakhi Vijan Dating A Businessman, Her First Marriage Failed After 10 Years

आता बिझनेसमनला डेट करत आहे रवीना टंडनची Ex-वहिनी, 10 वर्षे टिकले होते पहिले लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सासू-सासरे, नणंद रवीना टंडन आणि EX पती राजीवसोबत राखी विजन - Divya Marathi
सासू-सासरे, नणंद रवीना टंडन आणि EX पती राजीवसोबत राखी विजन

मुंबईः 'हम पांच' या टीव्ही मालिकेत स्वीटी माथुरची भूमिका साकारणारी अभिनेत्री राखी विजन सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याकाळात राखी एका बिझनेसमनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तिच्या आयुष्यात आलेली ही नवीन व्यक्ती एका कन्स्ट्रक्शन कंपनी आणि पोल्ट्री फर्मचा मालक आहे. राखी सध्या 'सजन के फिर झूठ मत बोलो' या मालिकेत झळकत आहे. 


रवीना टंडनची पुर्वाश्रमीची वहिनी आहे राखी...
- राखीने 6 वर्षांपूर्वी म्हणजे 2010 साली पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला होता.  
- 2000 मध्ये अभिनेत्री रवीना टंडनचा भाऊ राजीव टंडनसोबत राखीने लग्न केले होते.
- काही वर्षे सोबत राहिल्यानंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.
- राखीने एका मुलाखतीत म्हटले होते, "मी माझ्या या निर्णयाने आनंदी आहे." 
- "मी आणि राजीव जेवढा काळ सोबत होतो, तो काळ आम्ही खूप छान घालवला. घटस्फोटाचा निर्णय आम्ही दोघांनी सामंजस्याने घेतला आणि या निर्णयाने आम्ही दोघेही आनंदी होतो."


कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली भेट...
- सूत्राच्या माहितीनुसार. राखीची आणि या बिझनेसमनची भेट त्यांच्या एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली.
- पहिल्या भेटीनंतर त्याने राखीच्या सेटवर येणे सुरु केले. सध्या हे दोघे सीरिअस रिलेशनशिपमध्ये आहेत.


पुढील स्लाईड्सवर बघा, राखी विजनचे फॅमिली PHOTOS...  

बातम्या आणखी आहेत...