आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wedding Album: रवीनाचा अक्षयसोबत झाला होता साखरपुडा, या व्यक्तीची बनली दुसरी पत्नी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनचा आज वाढदिवस असून तिने वयाची ४२ वर्षे पूर्ण केली आहेत. फिल्ममेकर रवी टंडन यांची कन्या असलेल्या रवीनाचा जन्म २६ ऑक्टोबर १९७४ रोजी झाला. तिने आपल्या करिअरची सुरुवात सलमान खानसोबत 'पत्थर के फुल' (१९९१) या सिनेमातून केली. मात्र तिला मोठे यश १९९४ मध्ये रिलीज झालेल्या 'मोहरा' या सिनेमातून मिळाले. या सिनेमातील 'तू चीज बडी है मस्त मस्त' हे गाणे खूप गाजले होते. त्यानतंर तिला 'मस्त-मस्त' गर्ल हे टायटल मिळाले होते. मोहरानंतर अक्षयसोबत जुळले
होते रवीनाचे सूत...
'मोहरा' या सिनेमाच्या यशाने रवीना आणि अक्षयला एकमेकांच्या जवळ आणले होते. दोघांनी 'खिलाडियों का खिलाडी', 'दावा', 'किमत', 'बारुद' या सिनेमांमध्ये एकत्र काम केले. प्रत्येक सिनेमातून त्यांच्यातील जवळीत आणखी वाढत गेली. त्याकाळात खरं तर अक्षय आणखी काही अभिनेत्रींच्या जवळ होता. असे म्हटले जाते, की रवीनासोबत अक्षय त्याकाळात शिल्पा शेट्टीलाही डेट करत होता. तीन वर्षे अक्षय-रवीनाचे अफेअर होते. रवीनाने स्वतः कबुल केले होते, की तिने आणि अक्षयने मंदिरात गुपचुप साखरपुडा केला होता. दोघांचे नाते लग्नाच्या मांडवापर्यंत पोहोचले होते. मात्र शिल्पा आणि इतक आणखी काही अभिनेत्रींसोबत असलेल्या अक्षयच्या जवळीकीमुळे रवीनाने त्याच्यासोबत नाते संपुष्टात आणले होते.

अनिल थडानीसोबत लग्न...
अक्षयपासून विभक्त झाल्यानंतर रवीनाने 'स्टंप्ड' (२००३) या सिनेमाच्या शूटिंगच्या काळात चित्रपट वितरक अनिल थडानीसोबत डेटिंग सुरु केली होती. अनिल घटस्फोटित होते. लवकरच अनिल आणि रवीनाचे बाँडिंग जुळले आणि त्याच वर्षी दोघांनी साखरपुडा केला. त्यानंतर २२ फेब्रुवारी २००४ रोजी उदयपुर, राजस्थानच्या जग मंदिर पॅलेसमध्ये शाही थाटात लग्न केले. या लग्नानंतर रवीना अनिल थडानीची दुसरी पत्नी बनली. रवीनाने लग्नातील प्रत्येक विधी एन्जॉय केली होती. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. रणबीर हे मुलाचे तर राशा हे त्यांच्या मुलीचे नाव आहे. लग्नापूर्वी रवीनाने छाया आणि पूजा या दोन मुलींना दत्तक घेतले होते. रवीनाच्या या दोन्ही मुलींचे लग्न झाले आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, रवीनाच्या लग्नाचे निवडक फोटोज..
बातम्या आणखी आहेत...