आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादात अडकल्यानंतर प्रेमात पडले होते अरबाज-मलायका, हटके आहे Love Story

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - पत्नी मलायका अरोरा खानसह अरबाज खान) - Divya Marathi
(फाइल फोटो - पत्नी मलायका अरोरा खानसह अरबाज खान)
मुंबई: बॉलिवूड अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अशा तिहेरी भूमिका साकारणारा अरबाज खान आज (4 ऑगस्ट) 49वा वाढदिवस साजरा करत आहे. अरबाजचे वडील सलीम खान बॉलिवूडचे यशस्वी पटकथा लेखक आहेत. तर त्याचा थोरला भाऊ सलमान खान बॉलिवूडचा सुपरस्टार आहे आणि धाकटा भाऊ सोहेल खानसुद्धा अभिनेता-निर्माता आहे. अरबाजची पत्नी बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर मलायका अरोरा खान आहे. अरबाजने अभिनयाकडून आपला मोर्चा दिग्दर्शनाकडे वळवला. त्याने दिग्दर्शित केलेला 'दबंग 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता.
करिअरची सुरुवात..
4 ऑगस्ट 1967 रोजी जन्मलेल्या अरबाजने आपल्या करिअरची सुरुवात 1996 मध्ये रिलीज झालेल्या 'दरार' या सिनेमाद्वारे अभिनेत्याच्या रुपात केली होती. या सिनेमात त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती. यासाठी त्याला फिल्मफेअरचा बेस्ट व्हिलनचा अवॉर्डसुद्धा मिळाला होता. सिल्व्हर स्क्रिनवर अरबाजने सलमानसह यशस्वी सिनेमे दिले. त्यामध्ये 'प्यार किया तो डरना क्या', 'गर्व' या सिनेमांचा समावेश आहे. यासह 'कयामत', 'हलचल', 'मालामाल वीकली', 'भागम भाग', 'दबंग', 'दबंग 2' या सिनेमांमध्येही अरबाज झळकला आहे.
अरबाज-मलायकाची लव्ह स्टोरी...
बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर मलायका अरोरा खान अरबाज खानची पत्नी आहे. या दोघांची लव्ह स्टोरी रंजक आहे. 1993 मध्ये 'मिस्टर कॉफी' या जाहिरातीसाठी अरबाज आणि मलायकाला साइन करण्यात आले होते. ही जाहिरात एवढी बोल्ड होती, की त्यावरुन वादाला तोंड फुटले होते. या वादादरम्यान मलायका आणि अरबाज यांच्यातील जवळीक वाढली होती. दोघे आपला बराच वेळ एकत्र घालवू लागले होते. या दोघांनी काही अल्बममध्येही एकत्र काम केले. 5 वर्षे डेटिंग केल्यानंतर या दोघांनी 1997 मध्ये लग्न केले. या दाम्पत्याला एक मुलगा असून त्याचे नाव अरहान आहे.
अरबाज आणि मलायकाची गणना बॉलिवूडमधील हॉट कपल्समध्ये केली जाते. आजही त्यांचे प्रेम अगदी तसेच आहे, जसे सुरु झाले होते. मिस्टर कॉफी ही जाहिरात चालली नाही, मात्र यानिमित्ताने या दोघांना एकमेकांच्या रुपात आयुष्यभराचा जोडीदार लाभला. लग्न हा आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असल्याचे हे दोघे नेहमीच सांगतात.
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून दोघे विभक्त होणार असल्याच्या बातम्या झळकत आहेत. इंटरटेन्मेंट पोर्टल spotboye.com च्या वृत्तानुसार, मलायकाने काही दिवसांपूर्वीच खान कुटुंबाचा वांद्रे येथील बंगला सोडला होता. ती खार येथील अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली. तिच्यासोबत तिचा 14 वर्षांचा मुलगा अरहान राहात असल्याचे बोलले जात होते. असेही म्हटले जात होते, की मलायका एका ब्रिटीश बिझनेसमॅनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. वास्तविक मलायकाच्या व्यवस्थापकाने काही दिवसांपूर्वीच अरबाज आणि तिच्यात सर्व सुरळीत असल्याचे सांगितले होते. मात्र अरबाजची बहिन अर्पिताच्या डोहोळ जेवणाला मलायकाची अनुपस्थिती सर्वांना खटकली होती. परंतु त्यानंतर मलायका ईदनिमित्त रबाज खान आणि मलायका अरोरा खान एकत्र आले होते. त्यानंतर दोघांत सर्वकाही अलबेल असल्याचे बोलले जाते होते. आता दोघांत काय खिचडी शिजतेय हे त्यांनाच ठाऊक.
बातम्या आणखी आहेत...