आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Read Inside Gossips Of Bollywood On Divyamarathi

Inside Gossips: ‘लखन’ची भूमिका मिळण्यासाठी शाहिद कपूरचा आटापिटा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या १२ वर्षांच्या करिअरमध्ये शाहिदने जब वी मेट आणि राजकुमार हे दोनच कमर्शियल हिट चित्रपट दिले आहेत. ‘हैदर’ या गंभीर विषयाच्या चित्रपटाद्वारे त्याने स्वत:ला सिद्ध केले असले, तरी कमर्शियल मसालापटातून आपली सिद्धता तो दाखवू शकलेला नाही. त्यामुळेच रोहित शेट्टीच्या राम-लखनच्या रिमेकसाठी त्याचा प्रयत्न सुरू आहे. अनिल कपूरने साकारलेले लखनचे अायकॉनिक पात्र तो साकारू इच्छितो. 
 
दोन भावांमधील या चित्रपटात वरुण धवन सिद्धार्थ मल्होत्राचे नाव फिक्स होते. निर्माता करण जोहर असल्याने या दोन्ही नावांसाठी कुणालाही काही संदेह नव्हता. मात्र, आता शाहिद कपूरने लखनच्या पात्रासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शाहिदने स्पष्ट केले आहे की, जॅकी श्रॉफने साकारलेला साेज्वळ रामच्या रोलपेक्षा अनिल कपूरने साकारलेला अल्लड लखनचा रोल करण्यासाठी तो उत्सुक अाहे. 
 
रोहित शेट्टींना त्याने तसे संकेत पाठवलेही आहेत. लखनच्या पात्रासाठी शाहिदला घेतल्यास त्याच्यापेक्षा १० वर्षांनी ज्युनियर असलेला सिद्धार्थ त्याच्या मोठ्या भावाच्या भूमिकेला शोभणार नाही. रामच्या पात्रासाठी अर्जुन कपूरच्या नावाचीही चर्ची झाली. सूत्रांच्या माहितीनुसार आता तर रामच्या नावासाठी जॉन अब्राहमचेही नाव समोर येत आहे. 
 
अनिल कपूर-जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या राम-लखन चित्रपटाचा रिमेक येत आहे. त्यात लखनच्या पात्रासाठी शाहिद कपूरचा सध्या आटापिटा सुरू आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीपर्यंत त्याची इच्छा पोहोचली आहे. कमर्शियल चित्रपटात काम करण्यासाठी तो उत्सुक आहे. 
लखनच्या पात्रासाठी शाहिद कपूरच्या नावाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. निर्माता करण जोहरच्या निर्णयावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ते त्याचे विद्यार्थी असलेल्या वरुण-सिडला बाजूला सारून शाहिदला घेणार असतील, तर त्यासाठी मसाला फिल्ममध्ये पुन्हा एंट्री करण्याची ही नामी संधी ठरेल. 
 
पुढे वाचा, कपिलच्या जागी आता कृष्णा अभिषेक येणार...