मुंबई: शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याची बाहेरील आणि आतील छायाचित्रे अनेकदा समोर आली आहेत. विशेष म्हणजे, यातील काही फोटो असे आहेत, जे शाहरुखच्या बंगल्याची नाहीत. परंतु लोक त्याला खरे मानतात. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शाहरुखच्या बंगल्याचे REAL आणि FAKE फोटो दाखवणार आहोत.
काय आहे बंगल्याचे वैशिष्टे...
संपूर्ण व्हाइट मार्बलने तयार केलेला हा बंगला शाहरुखने 2001मध्ये भाई खोरशेद भानू संजना ट्रस्टकडून खरेदी केला होता. चार वर्षे या बंगल्याची पुर्नबांधणी चालू होती. त्यानंतर याला 'मन्नत' नाव देण्यात आले.
Five bedrooms
- शाहरुख-गौरीच्या या बंगल्याची रचना 1920च्या दशकातील ग्रेड 3 हेरीटेजप्रमाणे आहे.
- या बंगल्यात पाच बेडरुम आहेत. याशिवाय मल्टीपल लिव्हिंग एरिया, एक जिम, लायब्ररीसारख्या सर्व सुखसुविधा या घरात उपलब्ध आहेत.
- एखाद्या सेलिब्रिटीची लाइफस्टाइल मेंटेन करणारी प्रत्येक गोष्ट या घरात उपलब्ध आहे.
6000sq ft of luxury
- मुंबई स्थित फकीह अँड असोसिएट्सने मन्नतची सजावट केली आहे. या कंपनीचे मुख्य आर्किटेक्ट कैफ फकीह यानी आपल्या टीमसह सहा हजार चौ. फुटात या बंगल्याचे काम केले. - - - त्यांनी लाइट-फिटेड बॉक्सला जोडून एक उपभवन तयार केले. त्याला कैफ फकीह इंटरवेंशन सेंटर म्हटले जाते.
- येथेच फॅमिलीचे प्रायव्हेट अपार्टमेंट्स आहेत. कैफ यांच्या या उपभवनामुळे इंटेरियरला क्लासिक लूक मिळाला. त्यांनी ले-आउटवर पुन्हा काम केले, जेणेकरुन चारही बाजुने जाता यावे. - काही वास्तविक सजावटीला तसेच ठेवण्यात आले. बंगल्याचे दार उघडताच क्लासिक झलक बघायला मिळते.
- बंगल्याचा कलर पॅलेट डार्क अशून सरफेस अनफिनिश्ड ठेवण्यात आले आहे.
गौरीने स्वत: केले इंटेरिअर डिझाइन...
- या बंगल्याचे स्टायलिंगचे काम स्वतः गौरीने केले आहे. ती सांगते, की घर सजवण्यासाठी तिला तब्बल चार वर्षे लागली.
- ट्रॅव्हलिंगदरम्यान वेगवेगळ्या शहर, देशांतून तिने आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करुन घराची प्रत्येक बाजू सजवली आहे.
- यानंतरच गौरीने स्वतः इंटेरियर डिझायनर म्हणून काम सुरु केले.
Home is where the heart is!
- लिव्हिंग स्पेस जेवढी स्टायलिश ठेवण्यात आली आहे, तितकीच प्रायव्हेट स्पेस गौरीने साधी ठेवली आहे.
- गौरीने येथे प्रॅक्टिकल फर्नीचर ठेवले आहे. सोबतच पुस्तके आणि बोर्ड गेम खेळण्याची जागा आहे. येथे कुटुंबाचा एक मोठा फोटोसुद्धा लावण्यात आला आहे.
- बेडरुम मोठे असूनदेखील मॅनेजेबल आहेत.
- गौरी म्हणते, घर लहान असो किंवा मोठे, घर हे घर असते. तेथे तुम्हाला समाधान लाभतं. माझी मुले या
घरात लहानाची मोठी होत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाहरुखच्या मन्नतचे REAL आणि FAKE फोटो...