आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडची 'मल्लिका' अशी बनली रीमा लांबापासून बोल्ड अँड ब्युटीफुल अॅक्ट्रेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोल्ड सीनमधून मल्लिका शेरावतने लोकप्रियता मिळवली. - Divya Marathi
बोल्ड सीनमधून मल्लिका शेरावतने लोकप्रियता मिळवली.
पानीपत: हरियाणाच्या एका छोटाशा गावात रीमा लांबा अर्थातच मल्लिका शेरावतचा जन्म झाला. मल्लिका आज जगभरात ओळखली जाते. परंतु क्वचितच लोकांना ठाऊक असेल, की बॉलिवूडची 'मल्लिका' रीमापासून मल्लिका आणि लांबापासून शेरावत कशी बनली. मल्लिकाच्या आयुष्याशी निगडीत काही खास गोष्टी divyamarathi.com तुम्हाला आज सांगणार आहे.
करिअर बनवण्यासाठी आजीचे सोनेच आले होते कामी...
हिसारच्या अलखुरा गावातील मल्लिकाला आयुष्यात आई-वडिलांचा खूप राग सहन करावा लागला. वडिलांनी तीन वर्षे तिच्याशी बोलणे बंद केले होते.
- मल्लिकाने फिल्मी करिअर सुरु केल्यानंतर लोकांनी तिच्या चरित्र्यावर बोट उचलले आणि कलंक असल्याचे म्हटले होते. परंतु तिच्या आई-वडिलांनी तिला जास्त दिवस दूर न ठेवता काही वर्षांत आपलेसे केले.
- मल्लिकाचे खरे नाव रीमा लांबा आहे आणि सिनेसृष्टीत चांगले आणि लोकप्रिय नावाची एक वेगळीच कथा आहे.
- बालपणी ती आपल्या आजीकडे राहत होती. इतकेच नव्हे जेव्हा मल्लिकाला फिल्मी करिअर सुरु करायचे होते तेव्हा तिच्या आजीने तिला सोने विकून दिले होते.
नावाविषयी खूप कन्फ्यूजन होते म्हणून बदलेल...
- सिनेसृष्टीत रीमा ऐवजी मल्लिका ठेवण्याचे कारण, की इतर अभिनेत्रींपेक्षा आपले नाव वेगळे असावे आणि कन्फ्यूजन दूर व्हावे यासाठी तिने नाव बदलले.
- शेरावत आडनावाविषयी बोलायचे झाले तर कुटुंबीयांच्या नाराजी आणि आजोळी लहानाची मोठी झाल्याने आईचे आडनावानेच तिला ओळखले जात होते.
- मल्लिका सिनेसृष्टी येण्यापूर्वी वेगळे काम करत होती, असे कधीच स्वीकारत नाही. परंतु तुम्ही जाणून घेतल्यास आश्चर्य वाटेल, की मल्लिका अभिनेत्री होण्यापूर्वी एअरहोस्टेस होती.
असे झाले होते पहिले लग्न...
- एअरहोस्टेस म्हणून काम करताना 1997मध्ये जेट एअरवेजच्या पायलट कॅप्टन करण सिंह गिलसोबत मल्लिकाचे लग्न झाले होते. 2001मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
- घटस्फोटानंतर एअरहोस्टेसची नोकरी सोडून मल्लिका मॉडेलिंग आणि जाहिरातीत काम करू लागली. या कामांनी तिच्यासाठी फिल्म इंडस्ट्रीचे दार खुले झाले.
- मल्लिकाने अभिनयाची सुरुवात 'जीना सिर्फ मेरे लिए'मधून केली. परंतु 'मर्डर' सिनेमातून तिला नवीन ओळख मिळवून दिली. सोबतच, जॅकी चैनसोबत काम करणारी पहिली भारतीय अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे.
- जून 2007मध्ये हाँगकाँगच्या एका प्रसिध्द मासिकाने मल्लिकाला एशियाच्या सर्वाधिक सुंदर 100 लोकांच्या यादीत स्थान दिले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मल्लिकाचे ग्लॅमरस PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...