आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉन्ट्रॅक्टमधल्या एका अटीमुळे सैफच्या मुलीने सोडला करण जोहरचा चित्रपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सारा अली खान. - Divya Marathi
सारा अली खान.
मुंबई - अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी सारा करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द ईयर-2' मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार होती. पण तिने हा चित्रपट सोडला आहे. त्याचे कारण आई अमृता असल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार कॉन्ट्रॅक्टमधील एका अटीमुळे हा निर्णय घेतला. साराला एका टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीमध्ये नोंदणी करण्याची ही अट होती. त्यामुळे या एजन्सीने तिचे प्रोफेशनल मॅटर्स हँडल केले असते. पण अमृताने ही मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर साराने हा चित्रपट सोडला.

मॅगझिनसाठी फोटोशूट..
साराने अद्याप डेब्यू केला नसला तरी ती ग्लॅमर वर्ल्डमध्ये नवी नाही. तिने 2012 मध्ये 'हॅलो' फॅशन मॅगझिनसाठी शूट केले होते. त्यात तिची आईही तिच्याबरोबर होती. अनेक निर्मात्यांनी सारासाठी चित्रपट ऑफर केले. पण अमृताने नकार दिल्याचेही सांगितले जाते.

2012 मध्ये रॅम्पवर डेब्यू..
साराने ऑगस्ट 2012 मध्ये रॅम्पवर डेब्यू केला होता. मुकेश अंबानी आणि नीता अंबानींच्या एका पार्टीत तिने डिझायनर अबू जानी-संदीप खोसला चे आऊटफिट सादर केले होते. या डिझायनरने फॅशन वर्ल्डमध्ये 25 वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा सारा अली खानचे काही PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...