आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर या 8 कारणांमुळे झाला सलमान-ऐश्वर्याच्या लव्ह स्टोरीचा THE END

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटन्मेंट डेस्कः आजच्या काळात अभिनेता सलमान खानसोबत बॉलिवूडची प्रत्येक अभिनेत्री काम करण्यास इच्छूक आहे. मात्र एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या रायसोबत सलमान पुन्हा काम करण्याची दूरदूरपर्यंत काहीच चिन्ह नाहीत. यासाठी त्यांचा भूतकाळ कारणीभूत आहे. ऐश्वर्या सलमानची पुर्वाश्रमीची प्रेयसी असल्याचे जगजाहीर आहे. 1999 साली 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमाच्या शूटिंगच्या काळात दोघांमध्ये सूत जुळले होते. दोन वर्षे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र अचानक त्यांचे ब्रेकअप झाल्याचे सगळ्यांना कळले. तेव्हापासून ते आजपर्यंत हे दोघे कधी समोरासमोरसुद्धा आलेले नाहीत. मात्र ऐश्वर्या-सलमानची जोडी का वेगळी झाली, त्यांच्या ब्रेकअपमागे कुठली कारणे होते, जाणून घेऊयात...

सलमानचा रागीट स्वभाव...
ऐश्वर्या रायने स्वतः एका मुलाखतीत कबुल केले होते, की त्यांच्या ब्रेकअपसाठी सलमानचा रागीट स्वभाव आणि त्याने तिला केलेली मारहाण कारणीभूत आहे. ऐश्वर्याने सांगितले होते, की आमच्या ब्रेकअपनंतर सलमानने मला फोनवर वाट्टेल ते बोलला. इतकेच नाही तर तो नेहमी माझ्या को-स्टार्ससोबत माझे अफेअर असल्याचा संशय घ्यायचा. मी त्याकाळात अभिषेक बच्चनपासून ते शाहरुख खानपर्यंत सगळ्याच मोठ्या अभिनेत्यांसोबत काम करत होती. प्रत्येकासोबत तो माझे नाव जोडत होता. इतकेच नाही तर सलमानने अनेकदा मला मारहाणदेखील केली होती. तरीसुद्धा मी माझे काम सुरु ठेवायचे, जणू माझ्यासोबत काही घडलेच नाही, असे मी वागायचे.

पुढे वाचा, सलमान-ऐश्वर्याची मार्ग विभक्त होण्याची आणखी कोणती कारणे आहेत..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...