आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ \'धोनी\'च नव्हे तर या 16 फिल्म्समध्ये दाखवण्यात आले आहेत चुकीचे Facts

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः सुशांत सिंह राजपूत स्टारर एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 94 कोटींचा व्यवसाय केला आहे. इंडियन क्रिकेट टीमचा कर्णधार एमएस धोनीच्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. तसं पाहता रिअॅलिस्टिक मुद्द्यांवर सिनेमे बनवण्याचा ट्रेंड बॉलिवूडमध्ये प्रचलित आहे. फिल्ममेकर्स चर्चित मुद्द्याला हात घालून त्याला प्रेक्षकांसमोर 70 एमएमवर स्क्रिनवर सादर करत असतात. तसं पाहता, प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन ते सत्य घटनेवर आधारित सिनेमांमध्ये सिनेलिबर्टी घेऊन काही बदल करतात, जेणेकरुन स्टोरी रंजक बनते.

सिनेमात चित्रीत केले जातात चुकीचे Facts...
सिनेमाच्या कथेनुसार, धोनी (सुशांत सिंह राजपूत) आणि प्रियांका झा (दिशा पाटनी) यांची पहिली भेट फ्लाइटमध्ये होते. जेव्हा 2005 मध्ये धोनी मॅच खेळण्यासाठी विशाखापट्टनमला जातो. त्यापूर्वी भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात तो फक्त तीन रन बनवून आउट झालेला असतो. मात्र हा सिनेमा बनवण्यापूर्वीपर्यंत धोनी आणि त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडविषयी कुठेच चर्चा झाली होती. पण काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियांका आणि धोनीची पहिली भेट 2005 मध्ये नव्हे तर 2002 मध्ये झाली होती. त्यावेळी धोनीचे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण झालेले नव्हते. धोनीने त्याची पहिली इंटरनॅशनल मॅच डिसेंबर 2004 मध्ये बांग्लादेशाच्या विरोधात खेळली होती.

एखाद्या फिल्ममेकरने प्रेक्षकांसमोर अतिरंजित पद्धतीने एखादी कथा सादर करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही अनेक सिनेमांमध्ये चुकीच्या गोष्टी चित्रीत करण्यात आल्या आहेत. जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...