आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शत्रुघ्न सिन्हांवर प्रेम, पाकिस्तानी क्रिकेटरसोबत दोनदा लग्न; असे आहे रीना रॉयचे आयुष्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
80 आणि 90च्या दशकाला बॉलिवूडमधील चांगला काळ समजला जातो. या काळात अनेक नवीन चेहरे आणि टॅलेंटेड स्टार्सनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि बॉलिवूडमध्ये बराच बदल घडवून आणला. या स्टार्सपैकी काहीजण अजूनही बॉलिवूडच्या दुनियेत आपली जागा टिकवून आहेत, तर काही स्टार्स अचानक अज्ञातवासात निघून गेले. या स्टार्सनी बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर स्वतःचे विश्व निर्माण केले. यामध्ये जास्तीत जास्त नावे ही बॉलिवूडमधील अभिनेत्रींची आहेत. या अभिनेत्रींनी आपल्या काळात नाव, प्रसिद्धी आणि पैसा कमावला आणि अचानक लग्न करुन फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला.
 
अशीच एक अभिनेत्री म्हणजे रीना रॉय. रीना रॉय हिने नुकतीच वयाची 60 वर्षे पूर्ण केली आहेत. 7 जानेवारी 1957 रोजी तिचा जन्म झाला. शत्रुघ्न सिन्हासोबतचे अफेअर असो, किंवा पाकिस्तानी क्रिकेटर मोहसीन खानसोबत दोनदा लग्न असो, रीनाचे खासगी आयुष्य अनेक खाचखळग्यांनी भरले होते. बालपणीपासूनच तिने अडचणींचा सामना केलाय. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला रीनाच्या खासगी आयुष्याविषयी सांगत आहोत... 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या रीना रॉयविषयीच्या खास गोष्टी...  
बातम्या आणखी आहेत...