80 आणि 90च्या दशकाला बॉलिवूडमधील चांगला काळ समजला जातो. या काळात अनेक नवीन चेहरे आणि टॅलेंटेड स्टार्सनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि बॉलिवूडमध्ये बराच बदल घडवून आणला. या स्टार्सपैकी काहीजण अजूनही बॉलिवूडच्या दुनियेत
आपली जागा टिकवून आहेत, तर काही स्टार्स अचानक अज्ञातवासात निघून गेले. यामध्ये जास्तीत जास्त नावं ही बॉलिवूडमधील अभिनेत्रींची आहेत. या अभिनेत्रींनी आपल्या काळात नाव, प्रसिद्धी आणि पैसा कमावला आणि अचानक लग्न करुन फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला.
अशीच एक अभिनेत्री म्हणजे एक काळ गाजवाणारी रीना रॉय. बरीच वर्षे लाइमलाइट आणि सिल्व्हर स्क्रिनपासून दूर असलेली रीना आता पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात पुनरागमन करत आहे. मात्र यावेळी ती मोठ्या नव्हे तर छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होणा-या 'रानी महल' या मालिकेत रीना झळकणार आहे. या दैनंदिन मालिकेत ती राजमातेच्या भूमिकेत असून तिच्या भूमिकेला ग्रे शेड आहे. या मालिकेत रीना रॉयसोबत अनिता हसनंदानी, साक्षी तन्वर, वीजे बानी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
आपल्या अभिनय आणि सौंदर्याने एक काळ गाजवणारी रीना जवळजवळ 15 वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटील येतेय. मात्र एवढी वर्षे ती कुठे होती, तिने आपल्या करिअला कशी सुरुवात केली. तिच्या खासगी आयुष्यात कोणकोणते चढउतार आले, हे आम्ही तुम्हाला या रिपोर्टमध्ये सांगत आहोत..
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या आता रिना रॉय आहे एवढी वर्षे कुठे होती...