आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे पहिली भारतीय MISS WORLD, ग्लॅमरस जग सोडून अज्ञातवासात जगतेय आयुष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकी जवानांमध्ये रीता फारिया - फाइल फोटो - Divya Marathi
अमेरिकी जवानांमध्ये रीता फारिया - फाइल फोटो

मुंबई- 49 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजे 17 नोव्हेंबर 1966 रोजी रीता फारिया नावाच्या भारतीय तरुणीने मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावी केला होता. मिस वर्ल्ड बनणारी रीता पहिली भारतीय आणि आशियाई तरुणी आहे. मिस वर्ल्डसोबतच रीता या एक डॉक्टर (फिजिशिअन) आहेत. मॉडेलिंग क्षेत्रात वर्षभर यशाची चव चाखल्यानंतर रीता यांनी मेडिकलचे शिक्षण पूर्ण केले आणि याच क्षेत्रात आपले करिअर केले. रीता पहिल्या अशा भारतीय मॉडेल आहेत, ज्यांची क्रेज केवळ भारतातच नव्हे तर अमेरिका, आयरलँड येथेही बघायला मिळाली. मात्र काही काळ मॉडेलिंग केल्यानंतर त्यांने मेडिकल क्षेत्रात कार्य करण्याचा निर्णय घेतला आणि ग्लॅमरस आयुष्य सोडून आता अज्ञातवासात आपले जीवन व्यतित करत आहेत.
1971 मध्ये झाले लग्न
रीता यांनी डेविड पॉवेल यांच्यासोबत 1971 मध्ये लग्न केले. लग्नानंतर 1973 साली हे दाम्पत्य डबलिन येथे स्थायिक झाले. 1998 मध्ये फेमिना मिस इंडियाच्या परीक्षकाच्या रुपात रीता यांनी फॅशन दुनियेत कमबॅक केले होते. मिस वर्ल्ड स्पर्धेतदेखील रीता यांनी परीक्षकाची भूमिका बजावली आहे.
ग्लॅमरपासून दूर राहणे आहे पसंत
एका मुलाखतीत त्यांनी सांगितले, "मला पूर्वी ग्लॅमरस आयुष्य पसंत होते. मात्र मिस वर्ल्ड बनल्यानंतर लोकांना भेटणे मला आवडेनासे झाले. सर्व दिखावा होता. जीवन जगण्याचा खरा आनंद लोकांची सेवा करण्यात आले. त्यामुळे ग्लॅमरस आयुष्यापासून लांब डॉक्टरी पेशात मी आनंदी आहे."

युकेत झाला सन्मान
काही वर्षांपूर्वी रीता युनायडेट किंगडमच्या गोवन फेस्टिव्हलमध्ये दिसल्या होत्या. येथे गोवन कम्युनिटीच्या वतीने त्यांना सन्मानित कऱण्यात आले होते. रीता यांचा जन्म मुंबईत एका गोवन (मुळचे गोव्याचे) कुटुंबात झाला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, रीता यांचे निवडक PHOTOS...