आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 3 महिन्यांतच रेखाने फिरवली होती नव-याकडे पाठ, त्रासून नव-याने केली होती आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अलीकडेच लाँच झालेल्या 'रेखा द अनटोल्ड स्टोरी' या ऑटोबायोग्राफीत रेखाविषयी अनेक खुलासे झाले आहेत. यासेर उस्मान यांनी या पुस्कात रेखाच्या वैवाहिक आयुष्याविषयी उल्लेख केला आहे. ऑटोबायोग्राफीत रेखाने तिचे पती मुकेश अग्रवाल यांच्याकडे का पाठ फिरवली होती, लग्नाच्या वर्षभरातच मुकेश यांनी आत्महत्या का केली, याविषयी सांगितले गेले आहे. इतकेच नाही तर रेखाला मुकेश अग्रवाल यांच्या मृत्युस जबाबदार ठरवण्यात आले होते.

रेखाने दिल्ली बेस्ड बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केले होते. लग्नानंतर रेखा आणि मुकेश लंडनला गेले होते. लग्नानंतरचे काही दिवस छान गेले. कारण रेखा आणि मुकेश पहिल्यांदाच एकत्र एवढा वेळ घालवत होते. मात्र आठवड्याभरातच रेखाला उमगले, की मुकेश आणि ती एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत. मुकेश दिवसभरात भरपूर औषधे घेत असल्याने रेखा हैराण झाली होती. मात्र आता आयुष्यभराची सोबत असल्याने रेखाने याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले.

रेखा स्वतःशी बोलताना म्हणायची, "मला यांना यातून बाहेर काढायचे आहे. रेखाने ठरवले तर ती काय करु शकत नाही?" दोघे लंडनमध्ये आठवड्याभरापेक्षा जास्त वेळ थांबले होते. मुकेश सतत अस्वस्थ असल्याचे रेखाला जाणवत होते. एकेदिवशी मुकेश यांनी उदास मनाने रेखाला सांगितले, "माझ्या आयुष्यात आणखी एक AB आहे."

लग्नानंतरचा तीन महिन्यांचा काळा रेखासाठी भयावह ठरला. काही वेळ काढून रेखाने गोष्टी समजण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती हाताळण्यायोग्य नसल्याचे समजल्यानंतर रेखाने मुकेश आणि त्यांच्या कुटुंबीयांपासून फारकत घ्यायला सुरुवात केली. इतकेच नाही तर तिने मुकेशचे फोन घेणे बंद केले. डिप्रेशनमध्ये असलेल्या मुकेश यांच्यासाठी हा एक मोठा धक्का होता. अनेक वृत्तपत्रांनी रेखा आणि मुकेश यांच्या नात्याविषयी बातम्या प्रकाशित केल्या. काहींनी रेखा एक्सपोज्ड तर काहींनी रेखाचे नव-याचे आश्चर्यचकित करणारा भूतकाळ या मथळ्याने बातम्या प्रकाशित केल्या होत्या. एकेदिवशी बातमी आली, की मुकेश यांनी आपल्या बेडरुमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

जेव्हा रेखाच्या छायाचित्रांना काळं फासले...
1990 साली रेखा आणि जितेंद्र स्टारर शेषनाग हा सिनेमा रिलीज झाला होता. सिनेमाच्या रिलीजच्या काही दिवसांतच मुकेश यांनी आत्महत्या केली होती. याकाळात लोकांनी रेखाच्या सिनेमांच्या पोस्टर्सना काळे फासले होते. अनेक ठिकाणी तिच्या पोस्टर्सवर लोकांनी शेण फेकले होते. तिची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला गेला होता.
मीडियामध्ये मुकेश यांच्या आत्महत्येच्या बातम्या आक्षेपार्ह मथळ्याने प्रकाशित करणे सुरु केले होते, उदाहरणार्थ शो टाइम मॅगझिनने नोव्हेंबर 1990 च्या अंकात द ब्लॅक विडो हे शीर्षक दिले होते. तर सिने ब्लिट्जने 'द मकैब्रे ट्रुथ बिहाइंड मुकेश सुसाइड' या मथळ्याने वृत्त प्रकाशित केले होते.

चिडलेल्या अनिल गुप्तांनी त्यावेळी म्हटले होते, "माझ्या भावाचे रेखावर खरे प्रेम होते. तिच्या प्रेमासाठी प्रेम करा किंवा मरा अशी त्याची अवस्था झाली होती. रेखाने त्याच्यासोबत जे केले, त्याकडे डोळेझाक केली जाऊ शकत नाही. तिला आता काय हवंय, आमचा पैसा हवाय का तिला?"

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, रेखाच्या आयुष्यात आलेल्या 9 पुरुषांविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...