आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर चपलेने झाले होते रेखाचे स्वागत, वाचा कधीही न ऐकलेले किस्से

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः रेखाच्या ऑटोबायोग्राफीमध्ये तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा करण्यात आला आहे. यामध्ये लग्नाविनाच भांगात कुंकू भरणे असो किंवा विनोद मेहरांसोबत लग्नानंतर करण्यात आलेले चपलेने स्वागत असो, अनेक अचंबित करणा-या गोष्टींचा उलगडा या ऑटोबायोग्राफीत करण्यात आला आहे.

यासीर उस्मान यांनी लिहिलेल्या 'रेखा : अनटोल्ड स्टोरी' या ऑटोबायोग्राफीत याविषयी सविस्तर सांगण्यात आले आहे. रेखा यांचे विनोद मेहरांसोबत लग्न झाले होते. कोलकातामध्ये लग्न झाल्यानंतर रेखा विनोद मेहरांसोबत त्यांच्या घरी आल्या, तर विनोद यांच्या मातोश्री कमला मेहरा यांनी रागाच्या भरात रेखावर चप्पल उगारली होती. रेखा कमला मेहरा यांच्या पाया पडायला गेली असता, त्यांनी तिला धक्का दिला आणि घराबाहेर जाण्यास सांगितले. रेखा घराच्या दारातच उभी होती. त्यावेळी तिच्या सासूबाई कमला मेहरांनी तिला शिवीगाळ केली. विनोद मेहरा यांनी मध्यस्थी करत आपल्या आईची समजूत घातली. भांडणामुळे रेखा दुःखी झाली. ती रडत लिफ्टच्या दिशने गेली. विनोद यांनी रेखाला तिच्या घरी परत जाण्यास सांगितले आणि ते मात्र स्वतः आपल्या आईसोबतच राहिले.

रेखाने अमिताभ यांच्यासोबत काम का केले नाही, वाचा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...