Home »Gossip» Rekha Birthday Special, Married Life Of Rekha With Mukesh Agarwal

लग्नाच्या अवघ्या 3 महिन्यांतच नव-याला कंटाळली होती रेखा, असा झाला या नात्याचा अंत

दिव्य मराठी वेब टीम | Oct 09, 2017, 13:17 PM IST


बॉलिवूड अभिनेत्री रेखा उद्या म्हणजेच 10 ऑक्टोबर रोजी वयाची 63 वर्षे पूर्ण करणार आहे. 10 ऑक्टोबर 1954 रोजी चेन्नईत रेखाचा जन्म झाला. तिचे खासगी आयुष्य कॉन्ट्रोव्हर्शिअल राहिले आहे. यासिर उस्मान यांच्या 'रेखा : द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकात तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यासिर उस्मान यांनी या पुस्कात रेखा यांच्या वैवाहिक आयुष्याविषयी उल्लेख केला आहे. ऑटोबायोग्राफीत रेखाने तिचे पती मुकेश अग्रवाल यांच्याकडे पाठ का फिरवली होती, लग्नाच्या वर्षभरातच मुकेश यांनी आत्महत्या का केली, याविषयीचा उलगडा करण्यात आला आहे. इतकेच नाही तर रेखाला मुकेश अग्रवाल यांच्या मृत्युस जबाबदार ठरवण्यात आले होते.
मुकेश यांनी घातली होती रेखाला लग्नाची मागणी...
यासिर उस्मान यांनी पुस्तकात केलेल्या उल्लेखानुसार, 4 मार्च 1990 च्या दुपारी (पहिल्या भेटीच्या महिन्याभरानंतर) मुकेश अग्रवाल सुरिंदर कौर (रेखाची मैत्रीण) सोबत रेखाच्या घरी पोहोचले आणि तिला लग्नाची मागणी घातली. मुकेशचा उत्साह बघून रेखा अवाक् झाली होती. त्याकाळात दोघांचेही कुटुंब मुंबईत नव्हते. तरीदेखील त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
संध्याकाळी रेखा लाल रंगाची कांजीवरम साडी परिधान करुन मुकेश यांच्यासोबत लग्नासाठी मुंबईतील मुक्तेश्वर मंदिरात पोहोचली. शेजारीच इस्कॉन मंदिर होते. मात्र गर्दीमुळे हे कपल तिथे गेले नाही. रात्री जेव्हा मुकेश आणि रेखा मुक्तेश्वर मंदिरात पोहोचले. तेव्हा तेथील पुजारी संजय बोडस झोपले होते. मुकेश यांनी त्यांना उठवले आणि लग्न करायचे असल्याचे सांगितले. संजय रेखाला बघून चकित झाले. कारण रेखा नेहमीच त्या मंदिरात दर्शनासाठी येत होती. पण ती मुकेशसोबत लग्नासाठी तेथे आल्याचे समजल्यानंतर संजय बोडस चकित झाले होते. रात्री 10.30 वाजता पुजारीने त्यांचे लग्न लावले. त्यावेळी मुकेश 37 तर रेखा 35 वर्षांची होती.
जेव्हा हेमाने विचारले - ते खूप श्रीमंत आहेत का?
लग्नानंतर मुकेश यांनी रेखाला तिच्या फिल्मस्टार मित्रांना लग्नाची आनंदाची बातमी देण्यास सांगितले. मात्र रेखाला ही कल्पना आवडली नाही. रेखाने अकबर खान, संजय खान आणि हेमा मालिनी यांच्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. फ्रेंड सुरिंदर कौरला घेऊन ती हेमा आणि धर्मेंद्र यांच्या घरी पोहोचली. त्यावेळी हेमा यांनी रेखाला निरखून पाहिले आणि म्हटले, 'आता तू या व्यक्तीसोबत लग्न केले, असे मला सांगू नको.' रेखाने उत्तर दिले, 'होय मी लग्न केले आहे.' 'ते खूप श्रीमंत आहेत का?' असा प्रश्न हेमा यांनी रेखाला विचारला. मात्र रेखाने त्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.

पुढे वाचा, कसे होते रेखाचे वैवाहिक आयुष्य...

Next Article

Recommended