आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 Unseen Photos : कधीकाळी अशी दिसायची 'ब्युटीक्वीन' रेखा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री रेखा 63 वर्षाची होणार आहे. रेखाचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 साली चेन्नई येथे झाला होता. वयाच्या या टप्प्यावरही रेखा फारच ग्लॅमरस दिसते. पण जेव्हा रेखाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला तेव्हा मात्र ती अशी नव्हती. रेखाच्या जुन्या फोटोंवर नजर टाकली असता आपल्याला लक्षात येईल की आज इतकी सुंदर दिसणारी रेखा इतकी वेगळी दिसत असे.  'सावन भादो' पासून केला होता बॉलिवूड डेब्यू...
 
तामिळ अभिनेता जेमिनी गणेशन आणि अभिनेत्री पुष्पावली यांची मुलगी भानुरेखा गणेशनने तिच्या फिल्मी करीअरची सुरुवात तेलुगु चित्रपट  'रंगुला रत्नम'मधून केली होती. पण बॉलिवूडबाबत बोलायचे झाले तर रेखाने 'सावन भादो' या 1970 साली आलेल्या चित्रपटातून डेब्यू केला होता. रेखाने 'गोरा और काला' (1972), 'रामपुर का लक्ष्मण' (1972), 'कीमत' (1973), 'अनोखी अदा' (1973), 'दो अनजाने' (1976), 'खून पसीना' (1977), 'घर' (1978), 'सुहाग' (1979), 'उत्सव' (1984), 'जाल' (1986) यांसारख्या बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. 
 
 
रेखाने हिंदीसोबत तामिळ, तेलुगु, कन्नडच्या 180 हून जास्त चित्रपटात काम केले आहे. रेखाने तिच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार तिच्या नावे केले आहेत. रेखाचे लग्न बिझनेसमन मुकेश अग्रवालसोबत झाले होते पण तिचे नाव  अमिताभ बच्चन, नवीन निश्चल, जीतेंद्र, विनोद मेहरा, किरण कुमार यांसारख्या अभिनेत्यांसोबत जोडले गेले. 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा रेखाचे करिअरच्या अगोदरच्या काळातील PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...